माॅस्को : युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने भारताकडे मदतीची विनंती केली आहे. वृत्तसंस्था राॅयटर्सच्या एका वृत्तानुसार रशियाने भारताकडे विनंती केली आहे, की भारताने निर्बंधांमुळे प्रभावित झालेल्या माॅस्कोच्या तेल आणि गॅस (Oil And Gas) क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवावी. रशिया (Russia) आशियातील तिसऱ्या सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात रशियन कंपन्यांच्या विक्रीच्या जाळ्याचे विस्तार करण्यास इच्छुक आहे. १९९१ मध्ये सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियाची अर्थव्यवस्था सर्वात मोठ्या संकटाशी सामना करित आहे. कारण पाश्चात्य देशांनी युक्रेनवर हल्ला केल्यामुळे माॅस्कोवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. काही पाश्चात्य देशांनी भारताला युक्रेनवरील (Ukraine) रशियाच्या हल्ल्यांबाबत निंदा करण्यास सांगितले आहे. मात्र भारत आतापर्यंत रशियाविरुद्ध बोलण्यास टाळत आला आहे. (Russia Wants Indian Investment In Its Oil And Gas Sector)
रशियाची इच्छा आहे की भारताने गुंतवणूक वाढवावी
रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक म्हणाले, की भारतात रशियाचे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचे निर्यात १ बिलियन डाॅलरच्या जवळपास आहे. हा आकडा वाढवण्याची संधी आहे. नोव्हाक यांनी भारतीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांना म्हणाले, की आम्ही रशियन तेल आणि गॅस क्षेत्रात भारतीय गुंतवणुकीला आणखीन आकर्षिक करणे आणि भारतात (India) रशियन कंपन्यांचे विक्री नेटवर्कचे विस्तार करण्यास उत्सुक आहोत.
जागतिक ऊर्जा बाजारपेठेला बसेल फटका
अमेरिकेने या आठवड्यात रशियन तेल आयातीवर निर्बंध लादले. ब्रिटनने म्हटले आहे, की वर्षाच्या शेवटी टप्प्यांमध्ये प्रतिबंध लावणार आहे. दुसरीकडे रशिया कच्चा तेलाचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. अशा स्थितीत पाश्चात्य देशांच्या निर्णयामुळे जागतिक ऊर्जेचे बाजारपेठ आणखीन बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय कंपन्यांचे रशियन तेल आणि गॅस क्षेत्रांमध्ये भागीदारी आहे. रोसनेफ्टसह (आरओएसएन,एमएम) रशियन संस्थांची भारतीय रिफायनर नायरा एनर्जीमध्ये मोठा हिस्सा आहे. काही भारतीय कंपन्या रशियन तेलही खरेदी करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.