Russia War : प्रिगोझिन आणि पुतीन यांची ओळख कशी झाली ?

येवगेनी प्रिगोझिन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रेस्टॉरंट, वाईन शॉप उघडले.
Russia War : प्रिगोझिन आणि पुतीन यांची ओळख कशी झाली ?
Updated on

Russia War - येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. प्रिगोझिन यांच्या वॅगनर या खासगी सैन्यांने रशियाच्या तीन शहरांवर ताबा मिळवला असल्याचा दावा काही तासांपुर्वी केला. पुतीन यांना थेट चॅलेंज करणारे येवगेनी प्रिगोझिन आहेत तरी कोण? शहरात येवगेनी प्रिगोझिनचे खासगी सैन्य वॅगनर आणि रशियन सैन्यात चकमक सुरू आहे, वॅगनर हे खासगी लष्कर असून त्यांनी रशियन सैन्यासोबत युक्रेन युद्धातही सहभाग घेतला आहे.

येवगेनी प्रिगोझिन याचा गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश..

पुतीन यांना आव्हान दिलेले येवगेनी प्रिगोझिन याचा जन्म 1961 साली लेनिनग्राड येथे झाला . लहानपणीच वडिलांचे निधन झाल. त्याची आई एका रुग्णालयात काम करत होती. शालेय जीवनात येवगेनी प्रिगोझिनने क्रीडा अकादमीत प्रवेश घेतला.

मात्र, मेहनत घेऊनही त्याला अॅथलेटिक्समध्ये छाप टाकता आली नाही. तेव्हाच येवगेनी प्रिगोझिन गुन्हेगारीकडे वळला. त्यामुळे तुरुंगात जावे लागले. सोव्हिएत महासंघाच्या विघटना वेळी त्याला 1990 च्या सुमारास तुरुंगातून सोडले.

Russia War : प्रिगोझिन आणि पुतीन यांची ओळख कशी झाली ?
Ukraine Russia War: नाटोने युद्धात उडी घेतली तर रशियाची धडगत नाही

पुतीन यांच्याशी अशी झाली ओळख..

येवगेनी प्रिगोझिन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रेस्टॉरंट, वाईन शॉप उघडले. त्यावेळी उपमहापौर असलेले पुतीन त्याच रेस्टॉरंटमध्ये यायचे असे म्हणतात. मोठमोठे उद्योगपती, नेते रेस्टॉरंटमध्ये येत होते. रेस्टॉरंटमध्येचं प्रिगॅाझिन आणि पुतीन यांची ओळख झाली.

त्यानंतर पुतिन व प्रिगॅाझिन ची मैत्री वाढू लागली. पाहुण्यांसाठी अधिकृत जेवणाचे कंत्राट प्रिगोझिनला देण्यात आले, प्रिगोझिनला याच कालावधीतील भूमिका संशयास्पद राहिल्या असल्याचे म्हटले जात.

Russia War : प्रिगोझिन आणि पुतीन यांची ओळख कशी झाली ?
Russia Civil War : वॅगनर ग्रुपने घेतला रशियन लष्करी मुख्यालयाचा ताबा; मॉस्कोकडे करणार कूच

हळूहळू प्रिगोझिनला पुतीनचा उजवा हात म्हटले जाऊ लागले. त्याने भरपूर पैसे कमावले, रशियन सैन्यासह खाजगी सैन्याचे नेतृत्व केले. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पडद्यामागेही येवगेनी प्रिगोझिनचा वापर केला अस बोलल जात.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असो किंवा आफ्रिकेतील पूर्वेतील युद्ध लढणाऱ्या भाडोत्री सैनिकांच्या निर्दयी टोळी असो, हे येवेनगी प्रिगोझिनच्या खासगी सैन्याने केली. प्रिगोझिन २०२२ ला वॅगनरचे प्रमुख म्हणून सार्वजनिकपणे बाहेर आले. तेव्हाच आत्ता घडणाऱ्या परीस्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.