कोरोना म्हणजे 133 वर्षांनंतर परतलेला 'रशियन फ्लू'?

सराकारी नोंदीमधून महत्त्वाची माहिती आली समोर
corona
corona sakal
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) त्रस्त झाले आहे. या दरम्यान, काही देशांमधील रूग्णसंख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. हा विषाणू चीनच्या वुहान येथून आल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्वांमध्ये पुन्हा एकदा 133 वर्षांपूर्वी आलेल्या रशियन फ्ल्यू या आजाराची जोरदार चर्चा सुरू झाली असून, कोरोना विषाणूची उत्पत्ती सर्वप्रथम रशियामध्ये झाली होती का? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. Russian Flu & Corona Symptoms Are Same )

corona
कोडीं फुटणार! पंतप्रधान मोदी करणार ठाणे-दिवा रेल्वे मार्गाचे लोकार्पण

रशियन फ्ल्यूची लक्षणे

133 वर्षांपूर्वी म्हणजेच 1889 मध्ये रशियामध्ये फ्ल्यू पसरला होता. ज्याला रशियन फ्लू असे नाव देण्यात आले होते. या आजारात देखील श्वास आणि फुफ्फुसांना संक्रमण होत होते. या आजारानेदेखील त्याकाळी साऱ्या जगाला वेठीस धरले होते. कोरोनाच्या लाटांप्रमाणेच (Corona Wave) याच्यादेखील अनेक वर्षे लाटा येत राहिल्या. आता काही शास्त्रज्ञांनी रशियन फ्ल्यूचा कोरोना व्हायरसशी काही संबंध असल्याचे म्हटले असून हे SARS-CoV-2 व्हायरससी मिळते जुळते असल्याचे मत व्यक्त केले आहे.

corona
पुणे : कबुतर चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला जबर मारहाण

रशियन फ्लू वेळीदेखील बंद होत्या सर्व गोष्टी

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रशियन फ्लूच्या काळातही शाळा, बाजार, कार्यालये, कामाची ठिकाणे बंद (Lock Down) ठेवण्यात आली होती. ज्या लोकांना याची लागण होत होती, त्यांनादेखील चव आणि वास (Test & Smell ) येत नव्हता. तर काही लोकांमध्ये अनेक दिवस वेगवेगळी लक्षणे दिसून आली होती. त्याकाळी या आजारामुळे सर्वधिक वृद्ध लोकांचा मृत्यू झाला होता. तथापि, हा विषाणू इन्फ्लूएंझा विषाणूसारखा नव्हता जो लहान मुले आणि वृद्ध दोघांनाही गंभीर हानी पोहोचवेल.

corona
Punjab : 'युपी-बिहार के भैया' विधानावर मोदींचा चन्नी, प्रियंका गाधींवर हल्लाबोल

लक्षणे कोरोना सारखीच

रशियन फ्लूबद्दल असलेल्या त्या काळाच्या सरकारी आरोग्य नोंदी, वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांनुसार या आजाराचे लक्षणे कोरोना विषाणूसारखीच होती. रशियन फ्लू देखील एक संसर्गजन्य महामारी होती. तसेच कोरोना हा सुद्धा तशाच प्रकारची महामारी आहे. मात्र, कोरोना विषाणू हा रशियन फ्लूचाच एक बाग आहे हे अद्यापपर्यंत ठोस सांगणे कठीण आहे, असे मत फ्लू संशोधक आणि न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक पीटर पेलीज यांनी व्यक्त केले आहे.

corona
युक्रेनने रशियन बंडखोरांवर डागले बाॅम्ब, अमेरिकेचा हल्ल्याचा इशारा

रशियन फ्लू आणि कोरोना विषाणू एकच असल्याचे किंवा त्यांच्यात काही साम्य असण्याबाबत काही तज्ज्ञ सहमत नसल्याचे पीटर यांनी सांगितले. त्यामुळे हा सर्व अभ्यासाचा विषय असून, तो झाल्यास नक्कीच याबाबत स्पष्टता समोर येऊ शकेल. कारण, जुन्या नोंदीचा अभ्सास केल्यास रशियन फ्लूची लक्षणे कोरोनासारखीच असल्याचे दिसून येत आहे. सध्या, डॉ. जेफ्री टॉबेनबर्गर आणि जॉन ऑक्सफर्ड रशियन फ्लू आणि कोरोना विषाणू यांच्यातील साम्याबाबत अभ्यास करत आहेत.

डॉ. जेफ्री नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोगांच्या पॅथोजेनेसिस आणि इव्हॉल्यूशन विभागाचे प्रमुख आहेत. तर जॉन लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या व्हायरोलॉजी विभागात प्राध्यापक आहेत. हे दोघेही 1918 च्या फ्लू महामारीपूर्वी गोळा केलेल्या फुफ्फुसाच्या ऊतींचे परीक्षण करत आहेत. यामुळे त्या काळातील इन्फ्लूएंझा आणि कोरोना विषाणूचा अंश समजण्यास मदत होऊ शकणार आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करताना नवीन कोरोनाव्हायरसच्या व्हेरिएंटबद्दल किंवा रशियन फ्लूबद्दल माहिती मिळू शकेल अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.