Alexei Navalny: अलेक्सी नवाल्नी यांचा मृतदेह सापडला; डोक्यावर अन् छातीवर आढळल्या जखमा!

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली. (Vladimir Putin critic Alexei Navalny body was found)
Alexei Navalny
Alexei Navalny
Updated on

नवी दिल्ली- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली. नवाल्नी यांच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह एका हॉस्पिटलमध्ये आढळला आहे.

धक्कादायक म्हणजे त्यांच्या शरीरावर जखमा झाल्याचं दिसून आलं आहे. एका रशियन वृत्तपत्राने अनामिक वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (Russian opposition leader and President Vladimir Putin critic Alexei Navalny body was found in a hospital)

Alexei Navalny
सुंदर आणि गूढ रशिया

वैद्यकीय कर्मचाऱ्याने सांगितलं की, प्रोटोकॉलनुसार मृतदेह थेट फॉरेन मेडिसिन ब्युरोकडे पाठवला जातो. पण, अलेक्सी नवाल्नी यांच्याबाबतीत त्यांचा मृतदेह क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. कर्मचाऱ्याने Novaya Gazeta ला दिलेल्या माहितीत दावा केलाय की, जेव्हा त्यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आला, तेव्हा मृतदेहाच्या छाती आणि डोक्यावर जखमा होत्या.

काहीतरी लपवण्याचा प्रयत्न

नवाल्गी यांना मृतदेह आणल्यानंतर त्याला थेट शवागृहात नेण्यात आले. त्यानंतर शवागृहाबाहेर दोन पोलीस तैनात करण्यात आले होते. काहीतरी लपवलं जाण्याचा प्रयत्न केला जात होता, असं कर्मचाऱ्याने सांगितलं. सलग तिसऱ्या दिवशी नवाल्नी यांच्या कुटुंबियांना मृतदेह देण्यात आला नाही. ज्या ठिकाणी नवाल्गींचा मृतदेह ठेवण्यात आला आहे त्याठिकाणी त्यांच्या आईला देखील प्रवेश देण्यात आलेला नाही.

Alexei Navalny
Explained: पुतिन आजन्म राहू शकतात अध्यक्ष, मग निवडणुकांचा घाट कशासाठी? जाणून घ्या

किरा यारमास यांनी एक्सवर पोस्ट करुन म्हटलंय की, नवाल्नी यांची आई आणि त्यांचे वकील शवागृहाजवळ सकाळी आले होते. पण, त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. एका वकिलाला अक्षरश: धक्का मारुन बाहेर काढण्यात आले. नवाल्नी यांच्या मृतदेहाबाबत विचारले असता त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

रशियात आंदोलन

अलेक्सी नवाल्नी हे पुतिन यांचे कट्टर विरोधक होते. त्यांना ३० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, तीन वर्षातच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच रशियात आंदोलन उभे राहिले आहे. आतापर्यंत ४०० लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.