पुतीन यांची मोठी घोषणा; युक्रेनमधील पूर्वेकडील भागाचे दोन तुकडे

vladimir putin
vladimir putinSakal
Updated on

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमधील पूर्व भागाचे दोन तुकडे केले आहेत. डोनेत्स्क आणि लुहान्स्क (Donetsk And Luhansk ) या दोन भागांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली. रशियाने उचलेले हे पाऊल युक्रेन आणि रशिया यांच्यातील (Russia Ukraine Crises) तणाव आणखी वाढवणारे ठरु शकते. Rossiya-24 या स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पुतिन यांनी देशवासियांना संबोधित केले.

युक्रेनने शत्रुत्वाचा विचार बाजूला ठेवावा अन्यथा जे काही होईल त्याला ते स्वत: जबाबदार , अशा भाषेत पुतिन यांनी युक्रेनला तंबी वजा इशाराही दिला आहे. युक्रेनमधील पश्चिमी क्षेत्रातून विरोध होत असताना रशियाने युक्रेनमधील पूर्वेकडील भागाला स्वतंत्र बहाल करुन दोन तुकडे केल्यामुळे दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे संकेत आणखी गडद झाले आहेत. (Russian President Vladimir Putin Announces Recognition Of Donetsk And Luhansk As New Countries)

पुतिन म्हणाले की, " डोनेत्स्क (Donetsk) पिपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क (Lugansk) पिपल्स रिपब्लिक यांच्या स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व संदर्भातील मुद्दा बऱ्याच काळापासून प्रलिंबित आहे. यावर तात्काळ निर्णय घेणं आवश्यक आहे. युक्रेन अमेरिका केंद्रित ‘नाटो’ देशांच्या गटात सामील झाला तर रशियाच्या सुरक्षिततेसाठी ते अत्यंत धोक्याचे असेल, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.

यापूर्वी युक्रेनमधील फुटीरतावादी नेत्यांनी टेलिव्हिजनवरील प्रसारित एका निवेदनाच्या माध्यमातून रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विनंती केली होती. पूर्वेकडील भागाला स्वतंत्र बहाल करा आणि मित्रत्वाच्या करारावर स्वाक्षरी करायला पुढे या. युक्रेनच्या सैन्याकडून होणाऱ्या आक्रमणापासून वाचण्यासाठी मदत पुरवण्याचे आवाहनही फुटीरतावादी नेत्यांनी केले होते. या नेत्यांसोबत कोणतीही चर्चा करण्यापूर्वीत पुतिन यांनी पूर्वेकडील दोन भाग स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील तापलेल्या वातावरणात या निर्णयामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()