Russia-Ukraine war: पंतप्रधान मोदींचं नाव घेऊन युक्रेन वादावर रशियाचे अध्यक्ष पुतीन स्पष्टच बोलले; ''वाद मिटवण्यासाठी...''

रशिया आणि युक्रेनमधील वाद शांततापूर्ण मार्गाने मिटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी गुरुवारी केले.
Vladimir Putin Narendra Modi
Vladimir Putin Narendra ModiSakal
Updated on

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील वाद शांततापूर्ण मार्गाने मिटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी गुरुवारी केले. तसेच, मोदी यांनी पुढील वर्षी रशियाच्या दौऱ्यावरही यावे, असे निमंत्रणही पुतीन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यामार्फत दिले. युक्रेनसह विविध जागतिक प्रश्‍नांवर मोदींनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचेही पुतीन यांनी कौतुक केले.

रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी गुरुवारी पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पुतीन म्हणाले,‘‘युक्रेन युद्धातील परिस्थितीबाबत मी मोदींना वेळोवेळी माहिती दिली आहे. हा वाद शांततापूर्ण मार्गाने सुटला जावा, अशी मोदींची तीव्र इच्छा असल्याचे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची तयारी असल्याचे मला माहिती आहे. या मुद्द्यासह इतरही जागतिक समस्यांबाबत त्यांची भूमिका कायम सकारात्मक राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याशी अधिक सविस्तरपणे चर्चा होणे अपेक्षित आहे.’’

Vladimir Putin Narendra Modi
'महर्षी वाल्मिकी'; अयोध्येतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं!

जगभरात अनेक घडामोडी घडत असतानाही भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे सांगत पुतीन यांनी समाधानही व्यक्त केले. यानंतर त्यांनी मोदींना रशियामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. पुढील वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणूक असल्याची नोंद घेत पुतीन यांनी मोदींना शुभेच्छाही दिल्या. तसेच, सत्तेवर कोणताही राजकीय पक्ष आला तरीही भारत-रशिया यांचे संबंध कायम मैत्रीपूर्णच राहतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

व्यापार ५० अब्जांच्या पुढे

भारत आणि रशियामधील दृढ संबंधांत आणखी प्रगती होत असल्याचे सांगताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापाराने ५० अब्ज डॉलरचा टप्पा पार केला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामध्ये आणखी वाढ होण्याची क्षमता असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले. कुडनकुलम अणुप्रकल्पाला इंधनपुरवठा करण्याबाबत रशियाशी झालेल्या कराराची माहितीही जयशंकर यांनी दिली.

Vladimir Putin Narendra Modi
Pune Crime News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या, चार जणांनी मिळून एकाला संपवलं

या करारामुळे हा प्रकल्प आता वेगाने पुढे सरकेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पुतीन यांनी मोदींना रशियाभेटीचे निमंत्रण दिल्याच्या मुद्द्याचा उल्लेख करताना जयशंकर यांनी, दोन्ही नेत्यांना सोयीच्या तारखा पाहून लवकरच हा दौरा निश्‍चित केला जाईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.