रशियन सैन्याचे अल्पवयीन मुलींवर बलात्कार; युक्रेनच्या खासदाराचा गंभीर आरोप

russian soldiers raped minor girls women suffered burns claims ukrainian mp amid war
russian soldiers raped minor girls women suffered burns claims ukrainian mp amid war EmilioMorenatti/AP News
Updated on

रशिया युक्रेन यांच्यात मागच्या जवळपास 40 दिवसांपासून युध्द सुरु आहे, या दरम्यान युक्रेनने रशियावर अनेक भयंकर युद्ध गुन्हे केल्याचा आरोप केला आहे. रशियन सैनिकांनी अगदी १० वर्षांच्या मुलींवरही बलात्कार केले तसंच महिलांच्या शरीरावर डागल्याचा गंभीर आरोप युक्रेनच्या खासदाराने केला आहे.

त्यांनी देशाच्या युद्धग्रस्त भागांमधील भयंकर माहिती उघड करणारा फोटो शेअर केला आहे, त्यांनी यासोबत आरोप केला की दोन देशांमधील चालू असलेल्या लढाईत रशियन सैनिकांनी १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला, त्यांचा छळ केला आणि त्यांना ठार मारले.

युक्रेनच्या खासदार लेसिया बॅसिलेन्क यांनी ट्विटरवरून केलेले आरोप राजधानी किव्ह शहराजवळील बुचा येथून भीषण नरसंहाराचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर केले आहेत, जिथे हात बांधलेले, बंदुकीच्या गोळीच्या जखमा आणि छळाच्या खुणा असलेले मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसून आले होते. ट्विटमध्ये, खासदाराने एका फोटो शेअर करत लिहिले: "बलात्कार आणि ठार झालेल्या महिलेचा छळलेला मृतदेह. मी नि:शब्द आहे. माझे मन राग, भीती आणि द्वेषाने बधीर झाले आहे."

russian soldiers raped minor girls women suffered burns claims ukrainian mp amid war
'तुमचा अजाणचा भोंगा म्हणून आम्ही…'; मनसेच्या भूमिकेवर वळसे पाटलांची प्रतिक्रिया

युक्रेन सरकारने रशियावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप केला आहे, दरम्यान रशियाने हे आरोप फेटाळले आहेत आहे. युक्रेनियन सैन्याने अलीकडेच त्यांच्या रशियन समकक्षांकडून बुचासह किव्हच्या नजीकच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या चर्चच्या मागे सामुहिक कबरीती मृतदेहांचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या व्हिडिओमध्ये युक्रेनच्या बुचामध्ये, अनेक मृतदेह शहराभर पसरलेले दिसत होते.

रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले . तेव्हापासून या युद्धात लहान मुलांसह हजारो नागरिक आणि सैनिकांना जीव गमवावे लागले आहेत, तर देशभरातील लाखो लोकांना त्यांची घरे सोडून पलायन करावे लागले आहे.

russian soldiers raped minor girls women suffered burns claims ukrainian mp amid war
'मनसे ही भाजपची सी टीम तर MIM..'; आदित्य ठाकरेंचे राज ठकरेंवर टिकास्त्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.