मॉस्को: युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) या दोन युरोपियन देशांमध्ये तणाव वाढत चालला आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात फौजा तैनात (Troops deploy) केल्या आहेत तसेच रणगाडे, (Tanks) तोफा आणि युद्धनौकाही सज्ज ठेवल्या आहेत. जानेवारीच्या अखेरपर्यंत हल्ला करण्याची रशियाची योजना आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्याने केला आहे. रशिया तीन बाजूंनी हल्ला करण्याची तयारी करतोय, असे युक्रेनने म्हटले आहे.
रशिया उत्तरेच्या दिशेने बेलारुसकडून हल्ल्याची योजना आखत आहे. युक्रेनच्या गुप्तहेरांच्या अंदाजांनुसार, रशियाचा युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्लान आहे. रशियाला युक्रेनची जमीन बळकावयची आहे. बेलारुस आणि रशियन सैन्याने एकत्र युद्ध सराव केला. त्यावेळी ३५०० सैनिक पॅराशूटने उतरले होते. दुसऱ्या बाजूला रशियाने युक्रेनचा दावा फेटाळून लावला आहे.
युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र पाठवण्यात आली असून ते सीमेवरील आपल्या सैन्याला सुसज्ज करत आहेत. "पुतिन पाश्चिमात्य देशांबरोबर बुद्धिबळ खेळत आहेत. त्यांच्या मनात नेमकं काय आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही" असं युक्रेनचे नवे संरक्षण मंत्री ओलेसी रेजनिकोव मागच्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यात म्हणाले होते.
युक्रेनला धोका असल्यामुळे अमेरिकेने त्यांना रणगाडा विरोधी जेवलिन मिसाइल, रडार दिले आहेत. अमेरिकेने मिसाइल, ड्रोनपासून संरक्षण करणारी शस्त्र तसेच जॅमिंग उपकरण द्यावीत, अशी युक्रेनची मागणी आहे. ब्रिटनने युक्रेनला दहा युद्धनौका आणि नवीन मिसाइल डिफेन्स सिस्टिम देण्याचा करार केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.