आश्चर्य! मागील ७ महिन्यांत ८७ हजार भारतीयांनी सोडलं नागरिकत्व 

S Jayshankar
S JayshankarSakal
Updated on

नवी दिल्लीः भारतीयांच्या बाबतीत एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. या वर्षी जूनपर्यंत तब्बल 87,026 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिलीय.

लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, 2,25,620 भारतीयांनी 2022 मध्ये नागरिकत्वाचा त्याग केला. 2021 मध्ये 1,63,370, 2020 मध्ये 85,256, 2019 मध्ये 1,44,017, 2018 मध्ये 1,34,561,2015 मध्ये 31,489 भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला.

तसेच 2014 मध्ये 1,29,328, 2013 मध्ये 1,31,405, 2012 मध्ये 1,20,923 आणि 2011 मध्ये 1,22,819 भारतीयांनी त्यांचं भारतीय नागरिकत्व सोडलं. अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे.

S Jayshankar
BANW vs INDW 3rd ODI : 4 चेंडू, 1 धाव अन् 1 विकेट... भारत ना जिंकला ना हरला; सामन्यासह मालिकाही 'विभागून'

पुढे बोलतांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, मोठ्या संख्येने भारतीय नागरिक भारत सोडून इतर देशात जात आहेत. शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या अनेक भारतीयांनी वैयक्तिक सोयीसाठी परदेशी नागरिकत्व स्वीकारले असून त्यांनी यासाठी पसंती दिली आहे. 

S Jayshankar
Manipur Violence: मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया; म्हणाले, PM मोदींनी दखल...

परदेशातील भारतीय समुदाय ही देशाची संपत्ती आहे, यावर जयशंकर यांनी भर दिला. ते म्हणाले की, सरकारने परिवर्तनात्मक बदल घडवून आणला आहे. एक यशस्वी, समृद्ध आणि प्रभावशाली डायस्पोरा हा भारतासाठी एक फायदा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.