सोल (दक्षिण कोरिया) - औद्योगिक क्षेत्राच्या गरजा, उपयुक्त संशोधन याचा प्राधान्याने विचार करणारी शिक्षण व्यवस्था...सेमी कंडक्टर आणि नॅनो मेट्रोलॉजी उत्पादनात अग्रेसर असणारे औद्योगिक क्षेत्रातील अनुभव आणि हायब्रीड वर्गखोल्यांसह एकाचवेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जोडणारे ‘हाय-लाइव्ह एज्युकेशन मॉडेल’ हे भारतातील शिक्षण संस्थांमध्येही सामावून घेण्याच्यादृष्टीने झालेले विचारमंथन, हेच ‘सकाळ’ आयोजित ‘एज्युकॉन २०२४’चे वैशिष्ट्य ठरले.