पुणे / सोल (दक्षिण कोरिया) - दक्षिण कोरियातील औद्योगिक क्रांतीची साक्षीदार असलेली शिक्षण व्यवस्था समजून घेत, जागतिक पातळीवरील ज्ञानप्रणालीतील नव्या प्रवाहांसह संशोधनातील नावीन्यपूर्ण प्रयोगाचा वेध घेत, उच्च शिक्षणातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपलब्ध संधींबाबत भारतीय आणि दक्षिण कोरियातील प्राध्यापकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण झाली. निमित्त होते ‘सकाळ’ आयोजित ‘एज्युकॉन २०२४’ या शैक्षणिक परिषदेच्या पहिल्या दिवसाचे.