Sakal Educon South Korea 2024
सोल (दक्षिण कोरिया) - विज्ञान-तंत्रज्ञानातील नव्या प्रवाहांचा वेध घेत...उद्योगाच्या अपेक्षांनुसार शिक्षणात नवे बदल घडविणारी कार्यप्रणाली स्वीकारण्याची मिळालेली नवी उमेद... दोन्ही देशांच्या प्राध्यापकांमध्ये झालेले विचारांचे आदान-प्रदान, भारत आणि दक्षिण कोरियातील शैक्षणिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा खुला झालेला मार्ग यासह संशोधन, कौशल्य, इनोव्हेशनमधील नव्या संधींचे उपलब्ध झालेले व्यासपीठ, हेच ‘सकाळ’ने दक्षिण कोरियात घेतलेल्या ‘एज्युकॉन २०२४’ या शैक्षणिक परिषदेचे यश ठरले.