Salman Rushdie: कोण आहे सलमान रश्दी, ज्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकूने हल्ला झाला होता

एका कार्यक्रमादरम्यान सलमान रश्दी यांच्यावर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला
Salman Rushdie: कोण आहे सलमान रश्दी, ज्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकूने हल्ला झाला होता
Updated on

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इंग्रजी भाषेतील लेखक सलमान रश्दी यांच्यावर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लेखक सलमान रश्दी जमिनीवर कोसळले. सध्या हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात याबाबत चर्चा रंगू लागल्या पण अनेकांना माहिती नाही की सलमान रश्दी कोण आहे आणि सलमान रश्दी ज्यावर हल्ला झाला. त्यांचा भारताशी संबंध काय?

सलमान रश्दी यांचे पूर्ण नाव अहमद सलमान रश्दी. रश्दी हे सलमान रश्दीच्या नावाशी का जोडले गेले हे तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक ते जगातील सर्वात मोठे तत्वज्ञानी इब्न रुश्द (अव्हेरोस) यांच्या नावावर आहेत. त्यांचा जन्म 19 जून 1947 रोजी मुंबईतील एका भारतीय काश्मिरी मुस्लिम कुटुंबात झाला. सलमान रश्दीच्या वडिलांचे नाव अनीस अहमद रश्दी आहे. रश्दी मुंबईत लहानाचे मोठे झाले आणि त्यांचे शिक्षण दक्षिण मुंबईतील फोर्टमधील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये झाले.भारतातून इंग्लंडमध्ये गेल्यानंतर, त्यांनी वॉर्विकशायरमधील रग्बी स्कूलमधून आणि नंतर केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. ते ब्रिटिश भारतीय लेखक आहेत.

Salman Rushdie: कोण आहे सलमान रश्दी, ज्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकूने हल्ला झाला होता
Salman Rushdie: चाकू हल्ल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सलमान रश्दींनी 4 लग्ने केली आहेत. त्यांनी 1976 ते 1987 या काळात त्यांची पहिली पत्नी क्लेरिसा लुआर्डशी लग्न केले होते. दुसरी पत्नी अमेरिकन कादंबरीकार मारियान विगिन्स होती. ज्यांच्याशी त्यांचे लग्न 1988 ते 1993 पर्यंत टिकले, त्यानंतर घटस्फोट झाला. सलमान रश्दीचे तिसरे लग्न 1997 ते 2004 पर्यंत टिकले. त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव एलिझाबेथ होते. 2004 मध्ये, त्यांनी पद्मा लक्ष्मी, एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री-मॉडेल आणि अमेरिकन रिअॅलिटी-टेलिव्हिजन शो टॉप शेफ यांच्याशी विवाह केला. हे लग्न 2 जुलै 2007 पर्यंत चालले.

सलमान रश्दी हे सन 2000 पासून अमेरिकेत राहतात. सलमान रश्दी यांनी अनेक वादग्रस्त पुस्तके लिहिली. जसे- The Satanic Verses या पुस्तकावर इराणमध्ये 1988 पासून बंदी घालण्यात आली आहे. या पुस्तकातून रश्दींनी धर्मनिंदा केली आहे, असे अनेक मुस्लिमांचे मत आहे. या संदर्भात इराणचे तत्कालीन सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांनी रश्दींना फाशीची शिक्षा देण्याचा फतवा काढला होता.

Salman Rushdie: कोण आहे सलमान रश्दी, ज्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकूने हल्ला झाला होता
Salman Rushdie : प्राणघातक हल्ल्यानंतर रश्दी व्हेंटिलेटरवर; हल्लेखोराला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.