युनायटेड स्टेट्समधील (United States) नागरिकांना लेबल नसलेले लाल, पांढरे आणि पिवळ्या रंगाचे कांदे फेकून देण्याचा सल्ला देण्यात आलाय.
न्यूयॉर्क : युनायटेड स्टेट्समधील (United States) नागरिकांना लेबल नसलेले लाल, पांढरे आणि पिवळ्या रंगाचे कांदे फेकून देण्याचा सल्ला देण्यात आलाय. कारण, तिथं 37 राज्यांतील शेकडो लोक कांदा खाल्ल्यानंतर आजारी पडले आहेत. सध्या अमेरिकेत साल्मोनेला (salmonella) या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक पहायला मिळत असून अनेकजण या रोगानं आजारी पडू लागलेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं (CDC) म्हटलंय, की या संसर्गाचा स्रोत मेक्सिकोच्या चिहुआहुआमधून झाला असून तेथूनच कांदे आयात करण्यात आले होते. अहवालानुसार, आतापर्यंत 652 लोक आजारी असल्याची नोंद आहे, तर त्यापैकी 129 लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.
सीडीसीनं सांगितलं, की आजारी लोकांची वास्तविक संख्या खूप जास्त असण्याची शक्यता आहे, त्यापैकी बहुतेकांची नोंद केली जात नाही. हे संक्रमण 31 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान नोंदवले गेलंय. अहवालात म्हटलंय, की 75 टक्के आजारी लोकांनी कच्चा कांदा खाल्ला होता किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले होते. हे पाहता, सीडीसीनं नागरिकांना चिहुआहुआमधून आयात केलेला कांदा ताबडतोब फेकून द्यावा आणि लेबलशिवाय कांदा खरेदी करू नये, असा सल्ला दिलाय. तसेच कांदा ठेवलेला डबा देखील स्वच्छ धुण्याचा सल्ला देण्यात आलाय. साल्मोनेला संसर्गामध्ये रुग्णाला अतिसार, ताप आणि पोटदुखीचीही समस्या उद्भवते. सध्या या रोगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.