सोल : दक्षिण कोरियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समधील कामगार संघटनेचे सदस्य सोमवारपासून (ता.८) संपावर आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय कामगारांनी आज जाहीर केला.
भरीव वेतनवाढ आणि अन्य भत्ते मिळण्यासाठी ‘नॅशनल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स युनियन’ने (एनएसईयू) मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत संपाचे हत्यार उपसले आहे. तीन दिवसांच्या संपाचा आज सांगता होणार होती. त्यावेळी बेमुदत संपाची हाक संघटनेने दिली.
‘सॅमसंग’मधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांश म्हणजे ३० हजार कर्मचारी कामगार संघटनेचे सदस्य आहेत. मागण्यांबाबत व्यवस्थापन चर्चा करण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने हा औद्योगिक संप बेमुदत सुरू ठेवणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. ‘‘सोमवारी संप सुरू झाल्यापासून आम्ही व्यवस्थापनाशी बोललेलो नाही,” असे ‘एनएसईयू’चे उपाध्यक्ष ली ह्यून-कुक यांनी सांगितले.
संपामुळे चीप निर्मितीवर परिणाम झाल्याचा दावा कामगार संघटनेने केला असला तरी ‘सॅमसंग’ने सर्व दावे नाकारले आहेत. दक्षिण कोरियातील याआघाडीच्या कंपनीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.