Sri Lanka Crisis: सनथ जयसूर्या म्हणतो, भारताने मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला...

Sri Lanka Crisis: सनथ जयसूर्या म्हणतो, भारताने मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला...
Updated on

कोलंबो: श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व अशी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. या आर्थिक कोंडीमधून महागाई विकोपाला गेली असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील तीनपटीने वाढले आहेत. अन्नधान्यापासून पेट्रोल-डिझेलसाठी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्याचं चित्र होतं. या सगळ्या परिस्थितीमुळे प्रक्षोभक झालेली जनता सरकारविरोधात एकवटल्याचं दिसून आलं. त्यानंतर लागू करण्यात आलेली आणीबाणी आणि कर्फ्यू आता हटवण्यात आला आहे. अडचणीत असलेल्या श्रीलंकेला भारतानेही मदत केली असून आता श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने भारताचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. (Sri Lankan cricketer Sanath Jayasuriya)

Sri Lanka Crisis: सनथ जयसूर्या म्हणतो, भारताने मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला...
शिवसेनेचं मुंबईत उद्या शक्तिप्रदर्शन; राऊतांचं होणार स्वागत

सनथ जयसूर्याने भारताला 'मोठा भाऊ' म्हटलंय. श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वांत वाईट अशा आर्थिक संकटाच्या काळात मदत पाठवल्याबाबत त्याने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक देखील केलं आहे. (Prime Minister Narendra Modi)

पुढे तो म्हणाला की, या साऱ्या परिस्थितीचा त्रास होत आहे हे दाखवण्यासाठी लोक बाहेर येऊन सरकारचा निषेध करू लागले आहेत. सरकारने याकडे नीट लक्ष न दिल्यास या सगळ्याचं रुपांतर मोठ्या आपत्तीत होईल. आणि या सगळ्याची जबाबदारी सध्याच्या सरकारची असेल.जनता या परिस्थितीतून जात आहे हे दुर्दैव आहे. ते असे जगू शकत नाहीत म्हणूनच ते आंदोलन करताहेत. गॅसचा तुटवडा आणि तासनतास वीजपुरवठा नाही, असंही त्याने सांगितलं आहे.

Sri Lanka Crisis: सनथ जयसूर्या म्हणतो, भारताने मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला...
सण-उत्सव साजरे करण्यासाठी आता पुन्‍हा लागणार परवानगी

सनथ जयसूर्याने म्हटलंय की, एक शेजारी म्हणून आमच्या देशाचा मोठा भाऊ नेहमी आम्हाला मदत करतो... आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधानांचे खूप आभारी आहोत. ज्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत, त्यामधअये जगणं देखील सोपं नाहीये. मला आशा आहे की, ही परिस्थिती बदलेल तसेच भारत आणि इतर देशांच्या मदतीने आम्ही या परिस्थितीतून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहोत.

भारताने श्रीलंकेला आतापर्यंत 270,000 MT पेक्षा जास्त इंधन पुरवठा केला आहे. या मदतीमुळे श्रीलंकेतील वीज संकट कमी होण्यास खूपच मदत झाली आहे. सध्या श्रीलंकेमध्ये तीव्र अशा वीज कपातीचं संकट ओढवलं आहे. अन्न आणि इंधनाची गंभीर अशी टंचाई निर्माण झाली आहे. एकूणच कोरोना महामारीपासूनच या देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे.

कोलंबोमधील भारतीय दुतावासाने ट्विट करत माहिती दिली आहे की, भारताने इंधनाची केलेली मदत आता 270,000 MT पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या 24 तासांत 36,000 मेट्रिक टन पेट्रोल आणि 40,000 मेट्रिक टन डिझेलची प्रत्येकी एक खेप श्रीलंकेला वितरीत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.