बँकेने चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी, परत घेताना होतेय दमछाक

Santander Bank
Santander Bank
Updated on

समजा अचानक तुमच्या बँक खात्यात कुठूनतरी भरपूर पैसे आले, तर ते तुम्ही परत द्याल का? असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. युकेतील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या सॅंटेंडर बँकेने (Santander Bank) 130 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 1300 कोटी रुपये ख्रिसमसच्या (नाताळ) दिवशी चुकून हजारो खात्यात ट्रांसफर केले आहेत. विशेष म्हणजे सँटेंडर बँकेकडून थेट इतर बँकांच्या स्वतःच्या राखीव रकमेतून ही रक्कम पाठवण्यात आली आहे. आता ही रक्कम परत मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. (Santander Bank mistakenly deposited 13 billion rupees in customers account)

डेली मेलने दिलेल्या वृत्तनुसार, 25 डिसेंबर रोजी सॅनटेंडरच्या 2 हजार खात्यांमधून सुमारे 75 हजार व्यक्ती आणि कंपन्यांना दुसऱ्यांदा पेमेंट करण्यात आले. कारण या व्यक्ती आणि व्यवसायांना आधीच एकरकमी पेमेंट मिळाले होते. विशेष म्हणजे दुसरे पेमेंट थेट इतर बँकांच्या स्वतःच्या राखीव रकमेतून केले गेले. यामध्ये HSBC, NatWest,यांसारख्या बँकांचा समावेश आहे. त्यामुळे वसुली करणे बँकेसाठी कठीण झाले आहे. दरम्यान काही प्राप्तकर्त्यांनी आधीच पैसे खर्च केले असल्याची भीती असल्याचे HSBC, NatWest, यांसारख्या बँकांनी सांगितले.

बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे आमच्या कॉर्पोरेट क्लायंटकडून काही रक्कम ग्राहकांच्या खात्यांवर चुकीने वर्ग झाली, त्याबद्दल आम्ही क्षमी मागतो. डुप्लिकेट पेमेंट हे शेड्युलिंग बिघाडामुळे हा प्रकार घडला, जे आम्ही पटकन ओळखले आणि दुरुस्त केले.

Santander Bank
Airtel ची ऑफर, निवडक रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय डिस्काऊंट; पाहा डिटेल्स

सँटनेर बँक वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी याचवर्षी मे महिन्यात तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना जवळपास संपूर्ण दिवस पेमेंट करता आले नव्हते. त्यानंतर बँकेला माफी मागावी लागली होती. तसेच ऑगस्ट महिन्यात बँकेच्या ग्राहकांना त्यांचे ऑनलाइन खाते एक्सेस करता आले नव्हते.

पैसे परत मिळणार का?

युकेमधील मुख्य पेमेंट सिस्टम चालवणारी 'पे युके' संस्था सॅंटेंडर सोबत या विषयावर चर्चा करत आहे. तसेच बँक रक्कम वसूल करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे त्यासाठी इतर बँकांशी तसेच पैसे मिळालेल्या व्यक्तींशी संपर्क साधला जात आहे.

बँकेला पैसे परत मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम- बँक जबरदस्तीने ग्राहकांना पैसे परत पाठवण्यास सांगेल. तसेच बँकेकडे दुसरा पर्याय म्हणजे त्या ग्राहकांकडे जाऊन रक्कम परत मिळवणे. बँकेकडून एक स्टेटमेंटही देण्यात आले आहे, ज्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

Santander Bank
Jio Annual Plans : वर्षभर दररोज 3GB डेटा, फ्री कॉलिंगसह मिळेल बरंच काही

तर 10 वर्षांचा तुरुंगवास

यूकेच्या कायद्यानुसार, ग्राहकाच्या खात्यात चुकून आलेले पैसे बँका परत घेऊ शकतात. जर ग्राहकांनी पैसे परत केले नाहीत तर त्यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. या बँकेचे यूकेमध्ये सुमारे 1.4 कोटी ग्राहक आणि 616 शाखा आहेत. याआधी अमेरिकेच्या सिटी बँकेने देखील कॉस्मेटिक कंपनी रेव्हलॉनच्या कर्जदारांना चुकून $900 दशलक्ष पाठवले होते. बँक यातून 50 कोटी डॉलर वसूल करू शकली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने सांगितले की बँकेला ते वसूल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Santander Bank
आठवी पास अभिजीत धनंजय सराग ते कालीचरण होण्यापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()