इस्लामाबाद- लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज यांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारुन त्याची हत्या केली आहे. विशेष म्हणजे याच अमीर सरफराजने आयएसआयच्या इशाऱ्यानुसार पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेला भारतीय नागरिक सरबजीत सिंग यांची हत्या केली होती.(Sarabjit Singh killer killed Shot dead by unknown persons in Lahore pakistan news)
पाकिस्तानमधील ही मोठी बातमी म्हणावी लागेल. अमीर सरफराजने कोट लखपत तुरुंगात सरबजीत यांची पॉलिथिनच्या सहायाने गळा दाबून आणि मारहाण करुन हत्या केली होती. पाकिस्तानची गुप्तचर एजेन्सी ISI ने अमीरला सरबजीत यांना मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सरबजीत यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. ते भारताचे हेर असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
सरबजीत सिंह हे भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावाचे रहिवाशी होते. ते शेतकरी होते. ३० ऑगस्ट १९९० मध्ये चुकून सरबजीत पाकिस्तानच्या भागात पोहोचले होते. याठिकाणी त्यांना पाकिस्तान आर्मीने पकडलं होतं. सरबजीत यांच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले.
लाहोर आणि फैसलाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोपी म्हणून त्यांना तुरुंगात कैद करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात १४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांना या बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. याच दरम्यान, सरबजीत सिंह यांच्यावर तुरुंगातील इतर कैद्यांनी हल्ला केला होता. पाकिस्तानकडून त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. सरबजीत यांच्या सुटकेसाठी भारतातूनही प्रयत्न करण्यात आले होते. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.