Saudi Arabia Warns Pakistan : तुमच्या भिकाऱ्यांना आवरा... सौदीचा पाकिस्तान सरकारला इशारा; धार्मिक व्हिसाच्या नावाखाली होतेय घुसखोरी

Saudi Arabia Warns Pakistan : सौदीच्या हज मंत्रालयाने भिक्षेकऱ्याच्या मुद्यावरून पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाला इशारा दिला आहे.
Saudi Arabia
Saudi Arabia
Updated on


इस्लामाबाद, ता. २५ (पीटीआय) : पाकिस्तानच्या शाहबाझ शरीफ सरकारसाठी देशातील वाढते भिक्षेकरी डोकेदुखी ठरत आहे. प्रामुख्याने सौदी पाकिस्तानच्या भिक्षेकऱ्यांमुळे त्रस्त झाले आहे. धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली व्हिसा घेऊन सौदीत येणाऱ्या भिक्षेकऱ्यांची संख्या वाढत चालली असून त्यांना तात्काळ रोखावे, असे सौदीने पाकिस्तानला बजावले. वेळीच कारवाई केली नाही तर त्याचा परिणाम पाकिस्तानच्या हज यात्रेकरुंवर होऊ शकतो, असा इशारा सौदीने दिला आहे.

सौदीच्या हज मंत्रालयाने भिक्षेकऱ्याच्या मुद्यावरून पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाला इशारा दिला आहे. हज यात्रेकरू असल्याचे सांगत पाकिस्तानातील भिक्षेकऱ्यांना आखाती देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी तंबी दिली आहे. याप्रमाणे पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा उद्देश हज यात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या पर्यटन कंपन्यांसाठी नियमावली तयार करणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणे. तत्पूर्वी सौदीचे राजदूत नवाफ बीन सैद अहमद अल मलिकी आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी यांची बैठक झाली आणि यात सौदीत भिक्षेकऱ्यांना पाठविण्यासाठी जबाबदार असलेल्या माफियाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. या कुरापतींना पायबंद बसविण्यासाठी पाकिस्तानच्या फेडरल संस्थेवर देशातील माफियांचे जाळे मोडून काढण्याची जबाबदारी दिली आहे. भिक्षेकऱ्यांमुळे पाकिस्तानची प्रतिमा मलिन होत असल्याचे मोहसीन यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे भिक्षेकरी धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली आखाती देशाचा प्रवास करतात. ते ‘उमरा व्हिसा’वर जातात आणि नंतर पळून जातात आणि भिक्षेकरी होतात.

Saudi Arabia
Vidhansbha Election : ठाकरेंपासून शाहांपर्यंत 'विदर्भ' विधानसभेचं हॉटस्पॉट का ठरतंय?

पाकिस्तानच्या भूमिकेबाबत चिंता


अनिवासी पाकिस्तान संस्थेचे सचिव अर्शद मेहमूद यांनी या मुद्यावरून गतवर्षीच पाकिस्तानच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली. अनेक आखाती देशांनी पाकिस्तानच्या उदासीनतेवर नाराजी वर्तविली. अनिवासी पाकिस्तान आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मते, परदेशात पकडण्यात येणाऱ्या भिक्षेकऱ्यांपैकी ९० टक्के भिक्षेकरी पाकिस्तानचे असतात. अनेकदा भिक्षेकऱ्यांचा पुरवठा करणारी टोळी देखील पाकिस्तानात पकडण्यात आली आहे.

Saudi Arabia
Generation Z Job Crisis : 'जेन-झी' तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येत आहेत अडचणी? कंपन्यांनीच थेट सांगितलं कारण

यात्रेकरूंच्या वेशभूषेत जातात भिक्षेकरी


फेडरल इन्विस्टेगेशन एजन्सीला भिक्षेकऱ्यांना सौदीत पाठविण्यास जबाबदार असलेल्या माफियास चाप बसविण्याचे आदेश दिले आहेत. एक महिन्यांपूर्वी ‘एफआयए’ने कराचीच्या विमानतळावर सौदीला जाणाऱ्या एका विमानातून अकरा कथित भिक्षेकऱ्यांना पकडले होते. इमिग्रेशनच्या वेळी एफआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांनी सौदीला भिख मागण्यासाठीच जात असल्याची कबुली दिली. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत १६ भिक्षेकऱ्यांना विमानातून खाली उतरविण्यात आले. त्यांना आखाती देशांचा प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. मक्का येथे पकडण्यात आलेले बहुतांश खिसेकापू पाकिस्तानचे नागरिक असल्याचे उघड झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.