वॉशिंग्टन - अमेरिकेत विज्ञान शाखेचा अभ्यास करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे उपमंत्री कुर्ट कँपबेल यांनी सोमवारी (ता.२४) म्हटले आहे.
ते म्हणाले, ‘देशाला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची गरज आहे. चीनमधील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे स्वागत केले अमेरिकेने केले पाहिजे. पण विज्ञानासाठी नाही तर मानवविज्ञान शिकण्यासाठी त्यांनी यावे. अमेरिकेतील विद्यापीठे सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांसाठी चिनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर निर्बंध आणत आहे.
‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचा अभ्यास करण्याऱ्या अमेरिकी नागरिकांची संख्या पुरेशी नाही. या क्षेत्रांसाठी अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे, पण यासाठी चीनला नव्हे तर अमेरिकेचा महत्त्वाचा सुरक्षा भागीदार असलेल्या भारतातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल,’’ असे कँपबेल म्हणाले, असे वृत्त ‘रॉयटर्स’च्या हवाल्याने ‘एएनआय’ने दिले आहे.
अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून चिनी विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत सुमारे दोन लाख ९० हजार चिनी विद्यार्थी होते. पण सध्या अमेरिकेचे चीनशी संबंध तणावपूर्ण आहेत आणि अमेरिकेच्या तंत्रज्ञानचोरीमुळे चीनबरोबरील वैज्ञानिक सहकार्यही कमी झाले आहे. या प्रकरणात चिनी विद्यार्थ्यांवर संशय व्यक्त होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर चिनी विद्यार्थी अमेरिकेत भौतिकशास्त्र नाही तर मानवशास्त्र आणि सामाजिक विज्ञान शिकण्यासाठी आलेले मला पाहायचे आहेत, असे कँपबेल यांनी ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स थिंक टँक’शी बोलताना सांगितले.
चिनी हेरगिरी, बौद्धिक संपत्ती चोरी याविरोधात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड यांनी सुरू केल्या कारवाया अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात थंडावल्या. आशियाई-भारतीयांना वांशिक कारणांवरून लक्ष्य केले जात असल्याची टीका होऊ लागल्याने बायडेन यांनी या कारवाया थांबविल्या होत्या.
याबाबत विचारले असता, कॅंपबेल म्हणाले की, उच्च शिक्षणासाठी चिनी विद्यार्थी अमेरिकेत येण्यासाठी विद्यापीठांना प्रयत्न करायला हवेत. पण प्रयोगशाळेतील चिनी विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. काही ठिकाणी चिनी विद्यार्थ्यांवर बंधने आणण्याचे शक्य आहे. विशेष करून संपूर्ण अमेरिकेतील तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये त्यांच्यावर मर्यादा घालाव्या लागतील.
विज्ञानाच्या विद्यार्थ्यांची घटणारी संख्या भरून काढण्यासाठी चिनी विद्यार्थ्यांशिवाय पर्याय नाही, अशी काहीजणांचे म्हणणे आहे. पण तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रांमधील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असेल, असा मला विश्वास वाटतो.
- कुर्ट कँपबेल, परराष्ट्र मंत्रालयाचे उपमंत्री, अमेरिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.