सुपर व्हॅक्सिन! कोरोनाच्या सर्व व्हेरियंटना पुरुन उरणार

Vaccine
VaccineSakal
Updated on
Summary

जगावर जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचं संकट घोंघावत आहे. आतापर्यंत १८ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर या विषाणूमुळे जवळपास ३९ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे

नवी दिल्ली- जगावर जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचं संकट घोंघावत आहे. आतापर्यंत १८ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर या विषाणूमुळे जवळपास ३९ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. अशा या महाभयंकर विषाणूवर मात करण्यासाठी लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. पण, कोरोना वारंवार आपलं रुप बदलत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस हे व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येतंय. शिवाय कोरोना प्रतिबंधक लस नव्या व्हेरियंटवर कमी प्रभावी असल्याचं सांगितलं जातंय. अशात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सर्व व्हेरियंटचा खात्मा करणारी एकच अशी 'सुपर व्हॅक्सिन'चा शोध वैज्ञानिक लावत आहेत. (Scientists developing universal vaccine to fight Covid19 variants human trials next year)

जगावर कोरोनाच्या एका नंतर एक लाटा येत आहेत. लसीकरण सुरु आहे, पण कोरोनाच्या नव्या रुपामुळे धोका वाढला आहे. अशात युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या संशोधकांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक हायब्रिड लस तयार केली असून त्याला 'सुपर व्हॅक्सिन' असं नाव देण्यात आलं आहे. ही सुपर व्हॅक्सिन भविष्यात येणाऱ्या कोणत्याही कोरोना व्हेरियंटविरोधात प्रभावी असेल असा दावा त्यांनी केला आहे. वैज्ञानिकांचा दावा खरा ठरल्यास कोरोना विरोधातील हे एक मोठे यश म्हणता येणार आहे.

Vaccine
मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा अमेरिकेच्या ताब्यातच राहणार

वैज्ञानिकांनी सुपर व्हॅक्सिन डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचाही खात्मा करेल, असा दावा केलाय. या लशीची उंदरांवर चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या लशीची आता लवकरच माणसांवर चाचणी सुरु केली जाणार आहे. लस एनआरएनए प्रकारची आहे. मॉडर्ना आणि फायझर कंपनीच्या लशी याच प्रकारात मोडतात. या लशीमुळे प्राण्यांपासून माणसाला होणारे संक्रमण रोखले जाते. सुपर व्हॅक्सिन कोरोनामध्ये आढळणाऱ्या सरबेकोव्हायरस या मुळ घटकावर हल्ला करते. त्यामुळे कोरोना लढ्यात ही लस निर्णायक ठरणार आहे.

Vaccine
कोवॅक्सिन दोन वर्षांच्या मुलांवर काम करणार का?

वैज्ञानिकांनी 'सुपर व्हॅक्सिन' वर काम सुरुं केलं आहे. कोणतीही लस निर्माण करायचे असले तर त्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. पण, सध्याची परिस्थिती पाहता वैज्ञानिकांनी दिवसरात्र या लशीवर काम सुरु केले आहे. त्यामुळे लवकरच ही लस बाजारात येण्याची आशा आहे. असे झाल्यास 'सुपर व्हॅक्सिन' कोरोना आणि त्याचे व्हेरियंट यांचा कर्दनकाळ ठरेल आणि सर्वांना पूर्वीसारखं आयुष्य जगता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.