Revived Ancient ‘Zombie Virus : रशियातून पुन्हा डोकावणार का झोम्बी? सापडला 48,500 वर्षांपूर्वीचा व्हायरस

झोम्बी व्हायरसच्या पुनरुज्जीवनाची भीती
Scientists revive 48,500-year-old Zombie Virus buried in ice in Russia
Scientists revive 48,500-year-old Zombie Virus buried in ice in Russia सकाळ
Updated on

रशियातल्या बर्फातून उठतील का झोम्बी?

सकाळ वृत्तसेवा

शास्त्रज्ञांनी 48,500 वर्षे जुन्या झोम्बी विषाणूचे पुनरुज्जीवन झाल्याची शंका व्यक्त केली आहे. आजपर्यंत हे विषाणू जणू बर्फाखाली कैद होते मात्र ते आता पुनरुज्जीवित झाल्याने साथीच्या आणखी एका आजाराची भीती निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा आजार संसर्गजन्य असू शकतो.

Scientists revive 48,500-year-old Zombie Virus buried in ice in Russia
भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

ग्लोबल वॉर्मिंगमुळे धृवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत चालला आहे. हा वितळणारा बर्फ मानवासाठी नवा धोका निर्माण करू शकतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार यामुळे सुमारे दोन डझन विषाणू पुनरुज्जीवित झाले आहेत. ज्यामध्ये 48,500 वर्षांपूर्वीच्या त्या एका विषाणूचाही समावेश आहे.

ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, युरोपियन संशोधकांनी रशियाच्या सैबेरियन भागातून बर्फाळ जमिनीच्या विशिष्ट थराची (permafrost) तपासणी केली.

त्यामध्ये त्यांनी 13 नवीन रोगजनकांची ओळख पटवून त्यांच्या वैशिष्ट्यानुसार वर्गीकरण केले आहे. आणि त्याला "झोम्बी व्हायरस" असे म्हटले आहे.

गोठलेल्या जमिनीखाली वर्षानुवर्षं राहूनसुद्धा हे विषाणू संसर्गजन्य असण्याचा गुण टिकवून आहेत. त्यामुळे ते अधिक धोकादायक आहेत.

Scientists revive 48,500-year-old Zombie Virus buried in ice in Russia
Measles Infection : मुंबईत गोवरचा १५ वा बळी

यातील सर्वात जुन्या विषाणूला पँडोव्हायरस येडोमा म्हणून ओळखण्यात येणार आहे. हा विषाणू तब्बल 48,500 वर्षे जुना असल्याचं संशोधकांच्या संघाने म्हटलं आहे. याच संघाने 2013 मध्ये अशाच एका प्राचीन विषाणूचा शोध लावला होता. जो, 30,000 वर्षं जुना होता. पँडोव्हायरसने या विषाणूचा विक्रमही मोडला आहे.

Scientists revive 48,500-year-old Zombie Virus buried in ice in Russia
दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

शास्त्रज्ञांनी फार आधीच सांगितलं होतं, खरंतर इशारा दिला होता की, जागतिक तापमान बदलामुळे वातावरणात वाढ होते आहे आणि त्यामुळे धृवीय प्रदेशातील बर्फ वितळून बर्फाळ जमिनीचे प्रमाण कमी होत आहे.

यामुळे बर्फाखाली अडकलेले हरितगृह वायू वातावरणात मोकळे होण्याची भीती आहे. मिथेनसारख्या अशा वायूंचे वातावरणात मिसळणे धोकादायक ठरू शकते. पण सुप्त रोगजनकांवर त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही, असा अंदाज होता.

रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या संशोधकांच्या संघाने सांगितले की त्यांनी अभ्यास केलेल्या विषाणूंचे पुनरुज्जीवन होण्याचा किंवा केले जाण्याचा धोका नगण्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.