जगातील सर्वात जुन्या बर्फाच्या शोधात असणाऱ्या युरोपियन शास्त्रज्ञांच्या टीम एक मोठे संशोधन करण्याच्या तयारीत आहे. १.५ दशलक्ष वर्षांपुर्वीचा हा बर्फ अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) असल्याचे आढळल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्या बर्फापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खड्डा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आता अंटार्क्टिकामध्ये तब्बल १.५ मैल म्हणजेच २.७ किमीचा खड्डा खोदला खोदला जाणार आहे. बर्फाच्छादित प्रदेश असलेल्या अंटार्टिका खंडाने आपल्या पोटात जगाचे अनेक रहस्य लपवून ठेवले आहेत. या ठिकाणी मोठा खड्डा करुन त्या जुन्या बर्फापर्यंत पोहोचणे म्हणजे टाईम ट्रॅव्हल करुन इतिहासात जाण्यासारखे असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की, यातून ते मोठा इतिहास शोधून काढतील. ज्यामध्ये भुतकाळातील वेगवेगळ्या गोष्टींचे अवशेष सापडू शकतात. ज्यामध्ये हिमवादळांमुळे जमीनीखाली गेलेले धुलीकण, हवेच्या बुडबूड्यांचा समावेश आहे. या सर्व घटकांच्या नमुण्यावरुन शास्त्रज्ञांना तेव्हा पासून आतापर्यंत झालेले हवामानातील बदल शोधता येऊ शकतात. बर्फाच्या प्रत्येक थरामध्ये एक वेगळं रहस्य दडलेलं आहे.
यापुर्वी, इटलीच्या Ca'Foscari विद्यापीठातील रसायणशास्त्राचे तज्ञ कार्लो बार्बांटे हे देखील अशाच जुन्या बर्फाच्या शोधात होते. त्यांनी युरोपियन कमिशनला असे सांगितले होते की, मागच्या काही दशलक्ष वर्षांमध्ये पृथ्वीचे हवामान वेगवेगळ्या कालावधीत थंड आणि उष्णतेमध्ये बदलले आहे. सागराच्या खोल भागातून मिळालेल्या गाळ सदृश्य घटकावर झालेल्या संशोधनातून दर ४१,००० वर्षांनी पृथ्वीवर हवामान बदलते. त्यानुसार हवामान थंड आणि उष्ण होत असते. नंतर सुमारे दहा लाख वर्षांनी हे चक्र बदलले आणि त्याचा कालावधी ४१,००० वर्षांवरुन थेट १००,००० वर्षांवर गेला असे बार्बांटे यांनी सांगितले.
सेंटर फॉर ओल्डेस्ट आइस एक्सप्लोरेशन COLDEX ची घोषणा करताना अमेरिकन शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी २५ दशलक्ष डॉलर अनुदान मिळाले असल्याचे टाईम्स नाऊच्या वृत्तामधून समोर आले आहे. इतिहासातील संशोधनाची ही मोहीम युरोपियन प्रोजेक्ट फॉर आईस कोरिंग इन अंटार्क्टिका EPICA या संस्थेकडून राबविली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.