Second Largest Diamond: सापडला जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा हिरा, किती आहे किंमत ?

जगातला सर्वात मोठा हिरा कोणता आहे? अन् त्याचे नऊ तुकडे का करण्यात आले?
Second Largest Diamond
Second Largest Diamondesakal
Updated on

Second Largest Diamond :

जगातला सर्वाधिक मोठ्या आकाराचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा सापडला आहे. आफ्रिकेतील महाद्वीपमधील बोत्सवाना येथील खाणीत हा हिरा सापडला आहे. यापूर्वीही इथे असे मोठ्या आकाराचे हिरे सापडले आहेत.

२०१९ मध्ये या खाणीत १७५८ कॅरेटचा हिरा सापडला होता. आणि आता हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा कॅरेटचा हिरा सापडला आहे. जगातला सर्वाधिक मोठा हिरा हा ३१०६ कॅरेटचा आहे. (The world's second largest diamond)

Second Largest Diamond
PM Modi in US : ७ कॅरेटचा हिरा, चांदीचा गणपती अन् बरंच काही.. बायडेन दाम्पत्याला पंतप्रधान मोदींनी दिल्या खास भेटवस्तू

किती कॅरेटचा आहे हिरा

आफ्रिका महाद्विपाच्या बोत्सवानामध्ये सापडलेला हा हिरा २४९२ कॅरेटचा आहे. हा हिरा कॅनडातील लुकारा डायमंडच्या मालकीच्या खाणीत सापडला आहे. ब्रिटनमधील फायनांशिअल टाइम्समधील वृत्तानुसार, आता सापडलेल्या २४९२ कॅरेट हिऱ्याची किंमत ४० मिनिलन डॉलर्स इतकी आहे.

Second Largest Diamond
Diamond Industry: गुजरातमधील हिरे उद्योगात मंदी! कर्मचारी उचलताहेत टोकाचं पाऊल; 65 जणांनी संपवलं जीवन

हिऱ्यांची ही खाण राजधानी गेबरोनपासून ५०० किमी अंतरावर आहे. आफ्रिकेच्या दक्षिण राज्यांमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे. बोत्सवानामधील खाणींमध्ये २०१९ मध्येही एक मोठा हिरा सापडला होता. तो १७५८ कॅरेटचा होता.

इतका मोठा हिरा सापडला ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा हिरा शोधण्यासाठी मेगा डायमंड रिकव्हरी एक्स रे टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या हिऱ्यांचा शोध लागावा यासाठी २०१७ पासून अशा टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे, असे लुकारा डायमंडकडून सांगण्यात आले आहे. ही टेक्नॉलॉजी वापरून हिरे शोधले तर ते तुटण्यासापासून बचाव करता येणं सोपं झालं आहे.

Second Largest Diamond
Mumbai: 'कामासाठी अमराठी व्यक्ती हवा आहे'; अंधेरीतील कंपनीच्या जाहिरातीमुळे वाद

जगातला सर्वात मोठा हिरा कोणता आहे?

हिऱ्यांच्या खाणीत अनेक लहान-मोठे हिरे सापडतात. जगातला सर्वात मोठा हिरा हा १९०५ मध्ये साऊथ अफ्रिकेत सापडला होता. तो ३१०६ कॅरेटचा होता. तसा हिरा आजवर पुन्हा सापडलेला नाही. या हिऱ्याचे नाव कलिनन असे ठेवण्यात आले होते.

हा हिरा ज्या खाणीत सापडला त्याच्या मालक थॉमस कलिनन यांच्या नावावरून त्याला नाव देण्यात आहे होते. हा हिरा ९ तुकड्यांमध्ये कापण्यात आला. यातील सर्वात मोठा तुकडा ब्रिटनच्या राजघराण्यातील राजदंडात लावण्यात आला आहे. तर, दुसरा तुकडा राजघराण्याच्या मुकूटात बसवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.