Myanmar: म्यानमारमध्ये संघर्ष, भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; दिल्लीसाठी का आहे चिंतेचा विषय?

म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत
Myanmar
Myanmar
Updated on

नवी दिल्ली- म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे नागरिक म्यानमारमध्ये आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी आणि हिंसाग्रस्त भागात प्रवास करणे टाळावे. तसेच रस्त्यावरुन आंतराराष्ट्रीय प्रवास टाळावा, अशा मार्गदर्शक सूचना सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

भारत सरकारने यांगोन येथील दूतावासामध्ये नागरिकांना नोंदणी करण्यास सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आणि सुरक्षा दलांमधील संघर्षाने भीषण रुप धारण केले आहे. भारताने म्यानमारला शांततेचे आवाहन केले असून चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे. (security situation in Myanmar deteriorates further the government asked all Indian nationals to avoid non essential travel to the country)

Myanmar
म्यानमार : ३० जणांची हत्या, मृतदेह जाळले; मुलं-महिलांचा समावेश

भारतासाठी चिंतेचा विषय?

संघर्षाला सुरुवात झाल्यापासून हजारो म्यानमारचे नागरिक, काही लष्करी कर्मचारी यांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागात संघर्ष उभाळला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे भारतात स्थलांतर होत आहे. मिझोराम आणि म्यानमारमध्ये ५१० किलोमीटरची सीमा सामायिक आहे. त्यामुळे संघर्षाची व्याप्ती वाढल्यास मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ शकते.

.

Myanmar
Smart Fencing : भारत म्यानमार सीमेवर का बांधतोय स्मार्ट फेंस, जाणून घ्या सामान्य कुंपणापेक्षा यात वेगळं काय आहे?

भारताची भूमिका काय?

म्यानमारी लोकांच्या स्थलांतराबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या चीन प्रांतामध्ये संघर्षाची तीव्रता जास्त आहे आणि हा भाग भारताला लागून आहे. बंडखोर आणि लष्कर यांच्यामध्ये भारताने लष्कराची बाजू घेतली आहे. माहितीनुसार, भारत सरकारने २०२१ पासून म्यानमार लष्कराला शस्त्रास्त्रांचा पुरवठा देखील केला आहे. म्यानमारमध्ये परिस्थिती शांततेची असणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()