Voilence in America: अमेरिकेत गोळीबार सत्र सुरुच, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ३ मृत्युमुखी

Firing in America:अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उत्तर लुइसियाना प्रांताच्या श्रेवेपोर्ट शहरात गोळीबार झाला. या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला, तर कमीत कमी सहा अन्य लोक जखमी झाले.
Hingna firing case Arms sales in Nagpur from other provinces crime police
Hingna firing case Arms sales in Nagpur from other provinces crime policeSakal
Updated on

Firing in America:अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उत्तर लुइसियाना प्रांताच्या श्रेवेपोर्ट शहरात गोळीबार झाला. या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला, तर कमीत कमी सहा अन्य लोक जखमी झाले. अमेरिकेतील माध्यमांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर ही माहिती समोर आली.

माध्यमांना पोलिसांकडून माहिती मिळाली की, स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. त्यांची वाहने देखील जास्त प्रमाणात पार्क करण्यात आली होती. ज्यामुळे बळी पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यात समस्या आल्या. माध्यमांच्या अहवालानुसार पोलिस अधिकारी लेफ्टनंट वान रे म्हणाले की, "इकडे पोहोचणे आणि सर्वांना वैद्यकीय सेवा मिळवून देणे हे आव्हानात्मक काम होतं. आमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या गाड्या रस्त्याच्या बाजूला लावलेल्या होत्या, त्यामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागला."

वान रे पुढे म्हणाले की,"प्रतिक्रिया अधिकाऱ्यांना घटनास्थळी २ मृत शरीरे मिळाली आणि तिसऱ्या व्यक्तीचा दवाखान्यात दाखल केल्यावर मृत्यू." (Latest Marathi News)

श्रेवेपोर्टच्या एका व्यक्तीने सांगितले की, "ही एक ब्लॉक पार्टी होती, जी दरवर्षी ४ जुलै या दिवशी आयोजित केली जाते. अशी घटना नाही घडली पाहिजे. आता आम्ही आपल्या समाजात सार्वजनिक गोळीबाराचे बळी पडतोय. या सुट्टीच्या दिवशी चांगला वेळ घालवण्यासाठी जे लोक येतात, त्यांच्यासाठी हा धक्का आहे."

Hingna firing case Arms sales in Nagpur from other provinces crime police
Ajit Agarkar : कभी कभी लगता है मैं ही भगवान हूँ... अजित आगरकर ठरवणार कोण राहणार कोण जाणार?

माध्यमांना पोलिसांकडून माहिती मिळाली की, सोमवारी फिलाडेल्फियाच्या आग्नेय भागात दोन लहान मुलांसहित आठ लोकांना गोळी मारण्यात आली होती. पोलिसांच्या प्रवक्त्याच्या मते, एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एक हत्यार देखील ताब्यात घेण्यात आले.

पोलिस प्रवक्त्या जॅस्मिन रिली यांनी सांगितले की, सहा जखमी व्यक्तींना उपचारासाठी प्रेस्बिटेरियन मेडीकल सेंटर घेऊन जाण्यात आले, तर दोन लहान मुलांना फिलाडेल्फिया येथील चिल्ड्रन हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, आतापर्यंत अमेरिकेत सार्वजनिक गोळीबाराच्या कमीत कमी ३३९ घटना घडल्या आहेत.(Latest Marathi news)

Hingna firing case Arms sales in Nagpur from other provinces crime police
NCP Crisis Live : दीपक साळुंखे पाटील अजित पवारांच्या तर बहीण जयमालाताई गायकवाड शरद पवारांच्या गटामध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.