Sudan War : अन्न-पाण्यासाठी महिलांचे सैनिकांकडून लैंगिक शोषण;युद्धग्रस्त सुदानमधील स्थिती,विस्थापित कुटुंबांची परवड

युद्धाने ग्रासलेल्या सुदानमधील नागरिकांचे रोजचे जगणे अवघड झाले आहे. दोन वेळेचे अन्न मिळण्याची भ्रांत असलेल्या कुटुंबातील महिलांना अन्नाचे आमिष दाखवून सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे, असे वृत्त `द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले आहे.
Sudan War
Sudan War sakal
Updated on

लंडन : युद्धाने ग्रासलेल्या सुदानमधील नागरिकांचे रोजचे जगणे अवघड झाले आहे. दोन वेळेचे अन्न मिळण्याची भ्रांत असलेल्या कुटुंबातील महिलांना अन्नाचे आमिष दाखवून सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे, असे वृत्त `द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. सुदानमधील ओमदुरमन शहरात जोरदार धुमश्‍चक्री सुरू आहे. तेथे अडकलेल्या काही महिलांनी त्यांच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. अन्न किंवा वस्तू मिळविण्यासाठी सुदानी सैनिकांबरोबर लैंगिक संबंध ठेवणे हा एकच मार्ग होता. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी यातून पैसे उभे करता येणे शक्य होत आहे. सुदानी सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतरच अन्न-पाणी मिळत आहे, असा आरोप या महिलांनी केला आहे. गृहयुद्धामुळे सुदानाची आर्थिक स्थिती गेल्या वर्षापासून अत्यंत दयनीय झाली आहे. अन्न व पाणीही मिळेनासे झाले आहे.

ओमदुरमनमधील औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध असून तेथेच लैंगिक अत्याचाराचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले. ‘वृद्ध आई-वडील आणि १८ वर्षांच्या मुलीला अन्न देण्यासाठी सैनिकांशी शारीरिक संबंध ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी व्यथा एका पीडितेने व्यक्त केली. ‘‘माझे आई-वडील दोघेही खूप वृद्ध आणि आजारी आहेत. मी माझ्या मुलीला अन्नाच्या शोधण्यासाठी बाहेर पाठवू शकत नाही. यामुळे मी सैनिकांकडे गेले.अन्न मिळवण्याचा हा एकमेव मार्ग होता.

औद्योगिक परिसरात हे चित्र सर्वत्र दिसते,’’ असे तिने सांगितले. गेल्या वर्षी मे महिन्यात मांस प्रक्रिया कारखान्यात सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवणे भाग पाडण्यात आले, असेही ती म्हणाली. काही महिलांनी म्हणाल्या, की ‘ज्या घरांमध्ये लूट करता येऊ शकते अशा रिकाम्या घरांमध्ये प्रवेश देण्याच्या बदल्यात सैनिक देखील लैंगिक संबंधांची मागणी करत आहेत. सैनिकांशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अशा घरांमधून अन्न, स्वयंपाकघरातील वस्तू आणि अत्तरे नेण्यास मला परवानगी मिळाली, असे एका महिलेने सांगितले. जगण्यासाठी लाजिरवाणी कामे करण्यास भाग पडत असल्याचे दुःख तिने व्यक्त केले.

दोन जनरलमध्ये सत्तासंघर्ष

सुदानमध्ये १५ एप्रिल २०२३ पासून सुदानी सशस्त्र दल (एसएएफ) आणि तेथील ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ) यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू आहे.भू-सामरिकदृष्ट्या सुदान अत्यंत महत्त्वाचा देश आहे. अरब आणि आफ्रिकी देशांच्या मध्ये असलेल्या या देशात ९० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. सुदानच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल अब्देल अल फतेह अल बुऱ्हान आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि ‘आरएसएफ’चे नेते जनरल हमदान दगालो ऊर्फ ‘हेमेदती’ यांच्यातील सत्तासंघर्षावरून हे युद्ध सुरू आहे.

दहा लाख नागरिक विस्थापित

सुदानमधील धुमश्‍चक्रीत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून दहा लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. देशातील सुमारे दोन कोटी ६० लाख किंवा साधारणपणे निम्म्यापेक्षा जास्त लोक अन्न असुरक्षिततेचा सामना करीत आहे, असे ‘यूएन’च्या एका ताज्या अहवालात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com