पाकिस्तानचे पंतप्रधान होणार शहबाज शरीफ! नव्या सरकारची तयारी जोरात

Shahbaz Sharif will be the Prime Minister of Pakistan
Shahbaz Sharif will be the Prime Minister of PakistanShahbaz Sharif will be the Prime Minister of Pakistan
Updated on

पाकिस्तानमध्ये नव्या सरकारची तयारी जोरात सुरू आहे. विरोधी पक्षांनी शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या नव्या वझीर-ए-आझमचा निर्णय सोमवारी होणार आहे. इम्रान खान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शरीफ यांनी ट्विटद्वारे मीडिया, वकिलांचे आभार मानले होते. इम्रानविरोधातील अविश्वास ठराव रविवारी मंजूर करण्यात आला. १७४ खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. (Shahbaz Sharif will be the Prime Minister of Pakistan)

एआरवाय न्यूजनुसार, रविवारी विरोधी पक्षांनी संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांचे नाव दिले. शाहबाज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. रविवारी त्यांनी ट्विट केले की, मीडिया, सिव्हिल सोसायटी, वकील, नवाज शरीफ, आसिफ झरदारी, मौलाना फजल-उर-रहमान, बिलावल भुट्टो, खालिद मकबूल, खालिद मगसी, मोसीन दावर, अली वजीर, अमीर हैदर होता आणि सर्व पक्ष, संविधानासाठी उभे राहिल्याबद्दल आमचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार.

Shahbaz Sharif will be the Prime Minister of Pakistan
असा आहे शरद पवारांचा कार्यक्रम; नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणाले...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानचे (Pakistan) पुढील परराष्ट्र मंत्री बनवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करताना शरीफ यांचे नाव विशेष चर्चेत होते.

अविश्वास प्रस्ताव टाळण्याच्या अनेक प्रयत्नांनंतर पाकिस्तानच्या नॅशनल संसदेमध्ये मध्यरात्री मतदान झाले. यावेळी ३४२ सदस्यांच्या सभागृहात १७४ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. पाकिस्तानमध्ये कार्यकाळ पूर्ण न करता पंतप्रधानपद गमावण्याची घटना नवीन नसली तरी अविश्वास प्रस्तावाद्वारे पायउतार होणारे इम्रान पहिलेच पंतप्रधान आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.