Pakistan: पाकिस्तानला मिळाला नवा पंतप्रधान; बलुचिस्तानचा नेता घेणार पदाची शपथ

Pakistan: पाकिस्तानचे शहबाज शरीफ सरकार बर्खास्त झाल्यानंतर शनिवारी कार्यवाहक सरकारची स्थापना करण्यात आली होती.
anwar ul haq kakar
anwar ul haq kakaresakal
Updated on

इस्लामाबाद- पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर ऊल हक्क काकर यांची निवड करण्यात आली आहे. काकर बलुचिस्तानचे रहिवाशी आहेत. पाकिस्तानचे शहबाज शरीफ सरकार विसर्जित झाल्यानंतर शनिवारी कार्यवाहक सरकारची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रपतींनी त्यांना शनिवार पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान निवडण्यास सांगितले होते. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर अनवर रुल हक्क काकर यांची निवड करण्यात आली. आजच ते पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.(Shehbaz Sharif govt dissolved after anwar ul haq kakar elected as interim prime minister)

काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले शहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाज यांना शनिवारपर्यंत राष्ट्रपतींकडे काळजीवाहू पंतप्रधानाचे नाव द्यायचे होते. त्यानंतर अनवर यांच्या नावावर दोन्ही नेत्यांनी एकमत व्यक्त केलं. अनवर बलुचिस्तान प्रांतातून असून ते शनिवारीच पदाची शपथ घेतील असं सांगण्यात येतंय. पाकिस्तानची संसद ९ ऑगस्ट रोजी विसर्जित करण्यात आली होती.

anwar ul haq kakar
Manipur Violence: 'भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करु शकत नाही'; आसामच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

शहबाज शरीफ आणि राजा रियाज यांच्यात काळजीवाहू पंतप्रधान निवडण्यासाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या झडल्या. पंतप्रधान एका छोट्या प्रांतातून येणारा असावा, त्यामुळे त्या प्रांतातील प्रश्न प्राधान्याने सोडवता येतील असं आमचं मत झालं अशी माहिती राजा रियाज यांनी दिली. शहबाज शरीफ यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकिस्तानची संसद बरखास्त करण्यात आल्याने येत्या नव्वद दिवसात देशात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

anwar ul haq kakar
New Bill: लग्न किंवा नोकरीचे आमिष दाखवून महिलेशी संबंध ठेवल्यास होणार 'इतके' वर्षे तुरुंगवास

इम्रान खान सरकार पडल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. पाकिस्तान पूर्वीपासूनच आर्थिक आणि सुरक्षेसंबंधी समस्या झेलत आहे. राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानचे पाय आणखी खोलात जाणार आहेत. निवडणूक निष्पक्षपाती वातावरणात होण्यासाठी काळजीवाहू सरकारची स्थापना करणे आवश्यक होते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.