Sheikh Hasina resigns: आरक्षणाच्या प्रश्नावरुन बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी देश सोडला. त्यांनी बांदलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी घुसून जाळपोळ केली. शेख हसीना यांचं विमान भारतात दाखल झालं आहे.
बांगलादेशमध्ये आंदोलकांच्या तावडीतून निसटल्यानंतर शेख हसीना यांच्या विमानाने भारताकडे उड्डाण केलं. त्यांचं विमान दिल्लीतल्या हिंडन विमानतळावर उतरणार असून त्या दिल्लीच्या जवळ पोहोचल्या आहेत. सध्या त्या भारताच्या हद्दीत असल्याने सुरक्षित आहेत. भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले असल्याने त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला.
शेख हसीना या भारतात आल्या असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आश्रय देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहीतर त्या लंडनकडे कूच करतील, असंही सांगितलं जातंय. शेख हसीना भारतात राहिल्या तर त्या दिल्लीतच वास्तव्याला असतील. दिल्लीत राहून त्या काही बैठका घेणार असल्याची माहिती आहे.
बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि तेथील राजकीय भूकंपानंतर पुन्हा सत्ताकाबीज करणं हे हसीना यांचं उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळेच त्या दिल्लीमध्ये राहून पुढील रणनीती आखणार असल्याची माहिती आहे. शेख हसीना याआधी अनेक वर्षे दिल्लीत राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना इथं राहाणं सर्वच दृष्टीने सोयीचं ठरणार आहे.
दुसरीकडे बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी एक पत्रकार परिषद घेऊन शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं. आम्ही देशामध्ये अंतरिम सरकार स्थापन करणार असून कुठेही गोळीबार किंवा कर्फ्यू लागणार नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सध्यातरी बांगलादेशमध्ये लष्करी राजवट असेल, असं दिसून येतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.