प्रसव वेदनेने व्याकूळ महिलेला बॉसचा आदेश,म्हणाले...

या महिलेने कारमध्ये बसून पूर्ण केली मिटींग
Pregnant Women
Pregnant Womenesakal
Updated on

आई (mother) होणं हा जगातला सर्वात सुंदर अनुभव आहे असं म्हटलं जातं. असंख्य वेदना सहन करुन एक स्त्री नव्या जीवाला जन्म देत असते. त्यामुळे हा क्षण कितीही सुखद असला तरीदेखील त्या काळात होणाऱ्या वेदना अफाट असतात. त्यामुळेच या काळात स्त्रियांनी स्वत:ची व बाळाची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. परंतु, ऑफिसची एखादी मिटींग सुरु असतांना अचानक प्रसव कळा सुरु झाल्या तर तुम्ही काय कराल? सहाजिकच रुग्णालयात धाव घ्याल. पण, एका स्त्रीसोबत आश्चर्यचकित करणारा प्रसंग घडला आहे. लेबर पेन (labour pain) सुरु असतांना या महिलेला तिच्या वरिष्ठांनी चक्क मिटींग संपवून रुग्णालयात जा असं सांगितलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. (shocking-news-pregnant-women-attend-meeting-in-labour-pain-tweet-goes-viral)

सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला प्रसंग क्रिस्टिना या महिलेने तिच्या ट्विटर पेजवर शेअर केला आहे. हा प्रसंग क्रिस्टिनाच्या एका मैत्रिणीसोबत घडला आहे.

Pregnant Women
Pregnant WomenGoogle

ऑफिसची मिटींग सुरु असतांना एका महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या. ज्यामुळे तिने मिटींग अर्ध्यावर सोडून रुग्णालयात जावं लागेल असं सांगितलं. मात्र, मिटींग झाल्यावर तुम्ही रुग्णालयात जाऊ शकता का? असा प्रश्न तिच्या बॉसने विचारला. त्यामुळे या महिलेने चक्क कारमध्ये बसून बोर्ड मिटींग पूर्ण केली. हा प्रकार ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

"ऑफिसची मिटींग सुरु असतांना माझ्या एका गर्भवती मैत्रिणीचं वॉटर ब्रोक झालं. त्यामुळे तिने त्रास होतोय आणि आताच मला रुग्णालयात जावं लागेल असं सांगितलं. परंतु, एका प्रसिद्ध फंडच्या लीड इवेस्टरने आपण आधी मिटींग पूर्ण करुयात का?असा प्रश्न विचारला. विशेष म्हणजे या महिलेने रुग्णालयात जात असतांना चक्क कारमध्ये बसून ही बोर्ड मिटींग पूर्ण केली", असं क्रिस्टिनाने तिच्या ट्विटमध्ये सांगितलं.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी या बॉसला खडे बोल सुनावले आहेत. तर, असंख्य वर्किंग वुमन्सनेदेखील त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रसंगांचं कथन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.