Kamala Harris : ट्रम्प यांच्यानंतर आता कमला हॅरिस टार्गेटवर! निवडणूक प्रचार कार्यालयावर महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार

Shots fired into Kamala Harris campaign office : अमेरिकेतील अरिझोना राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या निवडणूक कार्यालयावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Kamala Harris
Kamala Harrissakal
Updated on

अमेरिकेतील अरिझोना राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या निवडणूक कार्यालयावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा टॅम्पे शहरातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. या कार्यालयाच्या समोरील खिडक्यांवर पॅलेट गनने गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

मंगळवारी एनबीसी न्यूजशी बोलताना टॅम्पे पोलिसांनी सांगितले की, ही घटना गेल्या रात्री झाली होती, डेमोक्रॅटिक नॅशनल कमेटीच्या कार्यालयावर गोळीबारामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

द न्यू यॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, टॅम्पे पोलिस पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर सार्जंट रयान कुक यांनी सांगितेल की, घटना घडली तेव्हा कार्यालय परिसरात कोणही नव्हते, पण या हल्ल्यामुळे बिल्डिंगमध्ये काम करणारे लोक यांच्यासोबतच आजूबाजूला राहाणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Kamala Harris
Kangana Ranaut On Farm Laws : "मी लक्षात ठेवले पाहिजे की आता..."; कंगना रनौतचा कृषी कायद्याच्या मुद्द्यावर यूटर्न!

लोकल टीव्ही चॅनलने दाखवलेल्या फुटेजमध्ये या कार्यालयाच्या एका दरव्याजावर आणि दोन खिडक्यांवर दोन गोळ्या लागल्याच्या खुणा देखील दिसत आहेत. दरम्यान या गोळीबाराचा तपास केला जात आहे.

रिपोर्टनुसार.अरिझोना डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख योलांडा बोजारानो यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, हे खूप दुखद आहे की अरिझोना डेमोक्रॅटिक पक्षाविरोधात हिंसाचार केला जात आहे. आम्ही सरकारच्या सुरक्षा यंत्रणांसोबत मिळून काम करत आहोत, जेणेकरून अशा प्रकारच्या धोक्याकडे गंभीरतेने पाहिले जाईल आणि आमचे कर्मचारी सुरक्षित राहतील.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सुरीवात झाल्यानंतर गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात ट्रम्प हे जखमी देखील झाले होते.

Kamala Harris
Pimpri Chinchwad Crime : धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये ८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, २३ वर्षीय नराधमाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.