श्रीलंकेत आर्थिक संकट आणखी गडद; पेट्रोल खरेदीवर निर्बंध

श्रीलंकेत आता मोटारसायकलमध्ये फक्त १५०० रूपयांच पेट्रोल भरता येणार आहे.
Todays Petrol-Diesel Rate
Todays Petrol-Diesel Rategoogle
Updated on

कोलंबो : श्रीलंका सध्या आर्थिक संकटात असून मागील काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून श्रीलंकेत गदारोळ निर्माण झाला होता. देशातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करण्यात आला होता. सध्या श्रीलंका आर्थिक संकटात सापडला असून नागरिक अन्न, इंधन आणि विजेच्या टंचाईस तोंड देत आहेत. आता सरकारने इंधन खरेदीवर सरकारने निर्बंध लावले आहेत.

(ShriLanka Economic Crisis)

श्रीलंकेत सध्या पेट्रोल खरेदीवर निर्बंध घातले असून मोटारसायकलमध्ये १५०० रूपये, तीनचाकी रिक्षामध्ये २५०० रूपये आणि चारचाकी गाड्यामध्ये ७००० रूपयापर्यंत पेट्रोल टाकता येणार आहे. दरम्यान, आता आणखी एक संकट या देशातील नागरिकांसमोर उभे ठाकले आहे. त्यानंतर देशाकडे इंधनखरेदीसाठीही पैसे नाहीत, असं पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी संसदेत स्पष्ट केलं होतं. पण भारताकडून इंधन खरेदी केल्यावर श्रीलंकेत खरेदी करण्साठू निर्बंध लावण्यात आले आहेत.

Todays Petrol-Diesel Rate
"श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदाराची स्वतःविरोधातच पोस्ट

श्रीलंकेत वीजपुरवठा खंडित होणे, रिकामे एटीएम आणि पेट्रोल पंपावरील रांगा यामुळ नागरिक त्रस्त झाले असल्याने त्यांनी आंदोलन पुकारले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंका पेट्रोलियम गॅसपासून साखरेपर्यंत जवळजवळ सर्वच वस्तू आयात करत असल्याने ही सगळी प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. परिणामी देशात प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी लांब रांगा दिसत होत्या. या सगळ्या संकटातून हा देश सावरताना आपल्याला दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.