Pakistan: पाकिस्तानी नागरिकांवर अशीही वेळ, विदेशात जाऊन मागतायेत भीक; पाकच्या अधिकाऱ्याची कबुली

Pakistan begging
Pakistan begging
Updated on

इस्लामाबाद- पाकिस्तान पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानचे लोक भीक मागण्यासाठी परदेशात जात असल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार, विदेशात जितक्या भिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाकिस्तानमधील आहेत. त्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

पाकिस्तानचे नागरिक व्हिसा काढून विदेशात जात आहेत आणि तेथे जाऊन भीक मागण्याचं काम करत आहेत. इराण आणि सौदी अरेबियाच्या तुरुंगामध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी भिकारी कैदेत आहेत. पाकिस्तानी लोक विदेशात जाऊन भीक मागत आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. (significant number of Pakistanis abroad are involved in begging)

Pakistan begging
Pakistan : पैशांसाठी पाकिस्तान लाचार; अमेरिकेसमोर... !

पाकिस्तान सरकारच्या सीनेटच्या स्थायी समितीमध्ये सांगण्यात आलंय की, विदेशात पाकिस्तानी नागरिक भीक मागण्याच्या कामात गुंतले आहेत. पाकिस्तान मंत्रालयातील परराष्ट्र सचिव जीशान खानजादा म्हणाले की, पाकिस्तानचे जवळपास १० लाख लोक विदेशात आहेत. त्यातील मोठी संख्या विदेशात भीक मागण्याच्या कामात आहे. पाकिस्तानी लोक व्हिसा घेऊन विदेशात भीक मागण्यासाठी जात आहे.

पाकिस्तानातून निघणाऱ्या विमानात मोठ्या प्रमाणात भिकारी प्रवास करत आहेत. विदेशात जाऊन भीक मागितल्याने अरब देशांमध्ये त्यांच्याविरोधात खटला चालवला जात आहे. मोठ्या संख्येने लोक सौदी अरेबियात भीक मागण्यासाठी जात आहे. इराण आणि सौदी अरेबियाची या प्रकारामुळे डोकेदुखी वाढली आहे.

Pakistan begging
ODI World Cup : पाकिस्तान क्रिकेटमध्ये गदारोळ सुरूच! वर्ल्डकपच्या १३ दिवसआधी दिग्गज खेळाडूने सोडली संघाची साथ

पाकिस्तान आर्थिक संकटात

पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. आयएमएफ आणि अन्य देशांकडून कर्ज मिळूनही पाकिस्तानची स्थिती सुधारलेली नाही. येथील नागरिकांचे जगणं मुश्किल झालं आहे. गरिब लोकांची संख्या वाढत आहे. पाकिस्तानात ३९.४ टक्के लोक गरिबीत जीवन जगत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.