लंडन : जालियनवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचं प्रकरण आहे. या हत्याकांडामध्ये ब्रिटीशांनी अनेक भारतीयांचा नरसंहार केला होता. या हत्याकांडाचे महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यावर झाले. या हत्याकाडांचा बदला घेण्यासाठी एक व्यक्ती ब्रिटनची महाराणी क्विन एलिझाबेथ द्वितीयच्या (Queen Elizabeth II) महालामध्ये घुसला होता. ब्रिटीश महाराणी एलिझाबेथ ख्रिसमस साजरा करण्यासाठी विंडसर कॅसलमध्ये पोहोचल्या होत्या. असं म्हटलं जातंय की, जसवंत सिंह चैल हा 19 वर्षीय आहे आणि 1919 साली अमृतसरमध्ये झालेल्या नरसंहाराचा बदला घेण्यासाठी तो महाराणीला मारु इच्छित होता. पोलिसांनी त्याला सध्या ताब्यात घेतलं आहे.
एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे निवासस्थान असलेल्या विंडसर कॅसल येथील सुरक्षा व्यवस्था भेदून आत प्रवेश करणाऱ्या या युवकाला पोलिसांनी काल अटक केली. या युवकाकडे शस्त्रही होते. बर्कशायर येथे असलेल्या विंडसर कॅसल (Windsor Castle) येथे राणी एलिझाबेथ या नाताळ साजरा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र युवराज चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला हेदेखील आहेत. एलिझाबेथ यांच्या या हवेलीच्या परिसरात संबंधित युवक विनापरवानगी शिरला होता. सुरक्षा भेदली गेल्याचे लक्षात येताच रक्षकांनी तातडीने हालचाल करत संबंधित युवकाला तो मुख्य इमारतीत शिरण्याआधीच ताब्यात घेतले. या घटनेत कोणालाही नुकसान पोहोचले नसून संबंधित युवकाची चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले होते.
द सनच्या रिपोर्ट्सनुसार लंडन पोलिस सध्या त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करत आहे. या घटनेचा एक हैराण करणारा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये जसवंत सिंह हातामध्ये शस्त्र घेऊन आहे. जसवंत सिंहने ख्रिसमसच्या दिवशी स्नॅपचॅटवर सकाळी 8.06 वाजता हा व्हिडीओ अपलोड केला होता. त्याला विंडसर कॅसलमध्ये ताब्यात घेतलं आहे.
जसवंतने आपला आवाज लपवण्यासाठी फिल्टरचा वापर केला होता. त्याने मास्क परिधान केला होता. त्याचा पेहराव स्टार वार्स फिल्ममधील असल्यासारखा दिसत आहे. त्याने व्हिडीओमध्ये म्हटलंय की, मला माफ करा. मी जे केलंय त्यासाठी मला माफ करा आणि मी जे करायला चाललोय त्यासाठीही मला माफ करा. हा 1919 सालच्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या हत्येचा बदला आहे. जसवंतने म्हटलंय की, जे जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये मारले गेले त्या लोकांच्या हत्येचा हा बदला आहे. त्यांच्या वंशामुळे त्यांच्यांशी भेदभाव करत अन्याय करण्यात आला. मी एक भारतीय शिख आहे. माझं नाव जसवंत सिंह चैल आहे. माझं नाव डार्थ जोन्स आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.