जर्मनीत काम करण्याची प्रबळ इच्छा असेल तर ते शक्य करता येते. या गोष्टीत तरूणीही मागे नाहीत. त्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्या दोघीही देशाच नाव जर्मनीत झळकवत आहेत. त्या दोघी आहेत ओल्गा हॉस्पिटलच्या सोशल व्हॉलंटिअर सिव्हा आणि लिया.
मुलींच्या शिक्षणाच्या सीमा रूंदावल्या तशा त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा प्रगती झाली. आजकालचे पालक मुलींना गावाबाहेर, शहराबाहेर शिक्षणाला पाठवतात. तसे ते मोठ्या पॅकेजची नोकरी लागावी यासाठीही प्रयत्न करतात. मुलगी परदेशात गेली असेल तर तितक्याच अभिमानाने ते सांगतात. अशीच या दोघींची गोष्ट आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सिव्हा आणि लिया सन २०२३ पासून स्टुटगार्ट येथील ओल्गा हॉस्पिटलमध्ये सोशल व्हॉलंटिअर म्हणून काम करीत आहेत. येथेच नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. सिव्हा आणि लिया या भारतीय तरुणी सोशल सर्व्हिस प्रोग्रामअंतर्गत २०२३ पासून स्टुटगार्ट येथील ओल्गा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
यापैकी लियाचे वडील जर्मन फुटबॉल संघाचे चाहते असल्याने आपल्या मुलीने जर्मनीत काम करावे, अशी त्यांची इच्छा होती. आणि त्यामुळेच लिया लँड हिअरसोबत मोठ्या जिद्दीने काम करत आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
तर, भारतातील सिव्हाचेही परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न होते. तिनेही ते सत्यात उतरवले आहे. या दोघी ओल्गा हॉस्पिटलमध्ये काम करतात. तिथे काम करताना त्यांना जर्मन नागरिकांना जवळून अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची संधी मिळाली. या लोकांसोबत बोलून जर्मन भाषा शिकता आली.
जर्मनीतील नागरिक अन् हॉस्पिटलमधील सहकारी अत्यंत प्रेमळ आणि मदतीला धावणारे आहेत, असे त्यांनी बोलून दाखविले. येथे काम केल्याने समाधान तर मिळतेच, शिवाय नवे मित्रही जोडता येत आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
येत्या काळात याच देशाला आपली कर्मभूमी बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोघींना नर्सिंगचे प्रशिक्षण घेऊन करिअर घडवायची इच्छा आहे. आपण एखाद्या ठिकाणी काम करतो तेव्हा फक्त कामावर लक्ष देतो. आपले आरोग्य, आनंद विसरून काम करतो. तसे, जर्मनीतल्या या कामाबाबत आम्हाला वाटत नाही. इथे खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्याची अनुभूती मिळतेय, असे सिव्हा आणि लिया यांनी बोलून दाखविले.
बाडेन-वुटेम्बर्ग ही केवळ काम करण्याची जागा नाही, तर येथे येऊन उत्तमरीत्या आयुष्य जगणे शक्य होते. इथे काम सांभाळत विविध छंद जोपासता येतात. कुटुंबाला वेळ देणं शक्य होतं, असेही त्या दोघी म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.