Global Warming : कार्बन उत्सर्जन कमी (Carbon Emmission) करण्यासाठी जगभरातील सहा बड्या कार उत्पादन कंपन्यांनी (Car Companies) पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या कार्यकाळात पेट्रोल - डिझेल (Diesel Petrol Vehicles) वरती चालणाऱ्या गाड्या तयार न करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यामध्ये भारतीय टाटा समुहाच्या (Tata Group) मालकीची असणारी जॅग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) कंपनीनेही सहभाग घेतला आहे.
या सहा कंपन्या होत आहेत सहाभागी
रायटर्स च्या वृत्तानुसार, स्वीडन मधील वॉल्वो (Volvo), अमेरिकेतील फोर्ड (Ford) आणि जनरल मोटर्स (General Motors), डायमलर एजीची मर्सिडीज बेंज (Mercedes Benz), चीनमधील बीवायडी (BYD) व टाटा मोटर्स (Tata Motors) ची जॅग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) या कंपन्या एक करारावरती सही करणार आहेत. त्यानुसार, ग्लोबल वार्मिंग ला नियंत्रणात ठेवण्यासाठी 2040 पर्यंत पेट्रोल - डिझेल वरती चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन या कंपन्या पुर्णरित्या बंद करणार आहेत.
ह्या मोठ्या कंपन्यांनी करार करण्यास दिला नकार
जगातील दोन मोठ्या गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिल्याने मोठा झटका बसला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, टोयोटा मोटर कॉर्प (Toyota Motor Corp) आणि फॉक्सवैगन एजी (Volkswagen AG) या कंपन्या यामध्ये सहभागी होणार नाही आहेत.
ह्या मोठ्या कंपन्यांनी करार करण्यास दिला नकार
जगातील दोन मोठ्या गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिल्याने मोठा झटका बसला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, टोयोटा मोटर कॉर्प (Toyota Motor Corp) आणि फॉक्सवैगन एजी (Volkswagen AG) या कंपन्या यामध्ये सहभागी होणार नाही आहेत.
अमेरिका, चीननेही दिला नकार
COP 26 Summit मध्ये ब्रिटन म्हणाला की, झिरो कार्बन उत्सर्जन करण्यासाठी ह्या सहा कंपन्यांव्यतिरीक्त अन्य चार देशही मोहिमेत भाग घेणार आहेत. त्यात न्यूझीलंड आणि पोलंड सारख्या देशांचा सहभाग आहे. मात्र, अमेरिका, चीन सारख्या मोठ्या कार उत्पादन करणाऱ्या देशांनी यामध्ये भाग घेण्यास साफ नकार दिला आहे.
दरम्यान, जगातील सगळ्यात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी स्टेलांटिस (Stellantis), जपानची होंडा (Honda) व निसान (Nissan), जर्मनीची बीएमडब्ल्यू (BMW), दक्षिण कोरियाची हुंडई (Hyundai) या कंपन्यांनीही झिरो कार्बन उत्सर्जन मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. तर मोबाइल अॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर (Uber) भाग घेऊ शकते, अशी माहिती मिळत आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.