Baltimore Bridge collapse: अमेरिकेत जहाजाच्या धडकेने कोसळला पूल, सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता; सर्व क्रू मेंबर्स होते भारतीय

Baltimore Bridge collapse: अमेरिकेतील बाल्टिमोर येथे भीषण अपघात झाला आहे. बाल्टिमोरमध्ये कंटेनर जहाज पुलाला घडकल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये सहा जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
Baltimore Bridge collapse
Baltimore Bridge collapseEsakal
Updated on

Baltimore Bridge collapse: अमेरिकेतील बाल्टिमोर येथे भीषण अपघात झाला आहे. बाल्टिमोरमध्ये कंटेनर जहाज पुलाला घडकल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये सहा जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (बुधवारी) मेरीलँड पोलिसांनी सांगितले की फ्रान्सिस स्कॉट ब्रिज कोसळल्यानंतर बेपत्ता झालेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बाल्टिमोर पूल कोसळल्यानंतर आठ जण बेपत्ता असल्याचे सांगितले होते, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे, तर उर्वरित सहा जणांसाठी बचावकार्य सुरू होते. पुढील सूचना मिळेपर्यंत बाल्टिमोर बंदरातील जहाजांची ये-जा थांबवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच वेळी, मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी सांगितले की, जहाजाच्या चालक दलाने अपघातापूर्वी आपत्कालीन संदेश पाठवला होता, ज्यामुळे अधिकाऱ्यांना पुलावरील वाहतूक थांबवण्यात आणि लोकांना तेथून बाहेर काढण्यात मदत झाली. आपत्कालीन संदेश आणि त्वरित प्रतिसादामुळे जीव वाचविण्यात मोठी मदत झाली. गव्हर्नर वेस मूर यांनी जहाजाच्या क्रूचे नायक म्हणून वर्णन केले आहे.

अपघातानंतर, शिपिंग कंपनी सिनर्जी मेरीटाइम ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे की, जहाजावर 22 क्रू मेंबर्स होते आणि ते सर्व भारतीय आहेत. यावर, यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) च्या प्रमुख जेनिफर होमेंडी यांनी सांगितले की, बाल्टिमोर, मेरीलँड येथील पुलावर धडकलेल्या कंटेनर जहाजावरील चालक दल आणि त्यांच्या राष्ट्रीयत्वाबाबत त्यांनी परस्परविरोधी माहिती ऐकली आहे.

Baltimore Bridge collapse
Taliban: "तर दगडाने ठेचून मारणार..." तालिबानी शिक्षांमुळे अफगाणी महिलांचे जगणे मुश्कील

948 फूट लांबीचे सिंगापूर-ध्वज असलेले जहाज मंगळवारी मेरीलँडमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजच्या खांबावर आदळले, त्यामुळे पूल कोसळला.

बायडन काय म्हणाले?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, बाल्टिमोर ब्रिज कोसळल्यानंतर 8 लोक बेपत्ता झाले होते, त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी एकाला कोणतीही दुखापत झाली नाही. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. बायडन पुढे म्हणाले, बाल्टीमोर बंदरात जहाजांची वाहतूक सध्या बंद आहे.

हे अपघाताचे कारण असू शकते

फुटेज पाहिल्यानंतर, तज्ञांनी अपघाताची चार कारणे दिली आहेत, (1) मुख्य इंजिनमध्ये बिघाड, (2) स्टीयरिंगमध्ये बिघाड, (3) जनरेटरमध्ये बिघाड आणि (4) पायलटची चूक यामुळे अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Baltimore Bridge collapse
Pakistan Terror Attack: पाकिस्तानात आत्मघाती हल्ला! ५ चिनी नागरिकांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

बाल्टिमोर ब्रिज 47 वर्ष जुना

बाल्टीमोरच्या दक्षिणेला असलेला हा कोसळणारा पूल पटापस्को नदीवर जवळपास २.५ किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेला आहे. हा पूल मार्च 1977 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 'द स्टार-स्पँगल्ड बॅनर'च्या लेखकाच्या नावावरून फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजचे नाव देण्यात आले. क्षेत्राचे गव्हर्नर मूर यांच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये 12.4 दशलक्षाहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे, न्यूजनेशनने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार. या पुलावरून दररोज सुमारे 30 हजार नागरिकांची ये-जा होत होती.

सर्व क्रू मेंबर्स होते भारतीय

अमेरिकेतील बाल्टिमोर येथील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजवर कोसळलेल्या कंटेनर जहाजातील सर्व २२ क्रू मेंबर्स भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

Baltimore Bridge collapse
Majeed Brigade: पाकिस्तानची डोकेदुखी ठरत असलेली 'माजिद ब्रिगेड' काय आहे? काय आहे इतिहास? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.