Ozone Layer : ओझोनच्या आवरणाच्या छिद्राचा आकार झाला ब्राझीलच्याही तीन पट; जगाची चिंता वाढली!

१९८५ मध्ये अंटार्क्टिकावरील ओझोन थराचा छिद्र पहिल्यांदाच सापडला.
Ozone Layer
Ozone LayerSakal
Updated on

अंटार्क्टिकावरील ओझोन छिद्राचा आकार झपाट्याने वाढत आहे. नवीन सॅटेलाइट डेटानुसार, त्याचा आकार आता ब्राझील देशापेक्षा तिप्पट मोठा आहे आणि भविष्यात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ सध्या हे कोडे सोडवत आहेत की ओझोनच्या छिद्राचा आकार अचानक इतका मोठा कसा झाला?

'स्पेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, अंटार्क्टिकातल्या समुद्राचा बर्फ ज्याप्रमाणे दरवर्षी वाढतो आणि कमी होतो, त्याचप्रमाणे ओझोनच्या छिद्राचा आकारही वाढतो आणि कमी होतो. या वर्षी ओझोन थराच्या छिद्राचा आकार वेळेच्या आधीच खूप वाढला आहे. १६ सप्टेंबर २०२३ पर्यंत, ओझोन छिद्राचा आकार १० दशलक्ष चौरस मैल किंवा २६ दशलक्ष चौरस किलोमीटर होता. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या कोपर्निकस सेंटिनल - 5P सॅटेलाइटने जारी केलेल्या डेटामधून हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

Ozone Layer
Trending News: 'गणपती'ने वाचवलं; लाटांमुळे समुद्रात हरवला १३ वर्षांचा मुलगा; २४ तासांनी जिवंत सापडला तो असा...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी २०२२ मध्ये टोंगामध्ये पाण्याखाली ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. काही संशोधकांच्या मते, हा स्फोट ओझोन छिद्र वाढण्याचे कारण असू शकतो. हा स्फोट गेल्या शतकातील सर्वात मोठा नैसर्गिक स्फोट होता आणि अमेरिकेची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अणुचाचणी होती.

शास्त्रज्ञांच्या मते, ओझोनच्या छिद्राचा आकार वाढत आणि कमी होत आहे. दरवर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला अंटार्क्टिकामध्ये वसंत ऋतु येतो. या काळात, ओझोन छिद्र वाढू लागते आणि ऑक्टोबरमध्ये त्याचा आकार बराच मोठा होतो. यानंतर त्याचा आकार कमी होऊ लागतो. याचं कारण अंटार्क्टिकामध्ये उन्हाळा आहे आणि या काळात स्ट्रॅटोस्फियरचे तापमानही वाढू लागते.

जसजसं स्ट्रॅटोस्फियरचं तापमान वाढतं, ओझोन छिद्राचा आकार कमी होतो आणि नंतर थांबतो.२०२३ मध्ये, ओझोन छिद्र ऑगस्टच्या सुरुवातीस वाढू लागलं. ओझोनच्या छिद्राचा आकार कधी कमी होईल याची माहिती सध्या शास्त्रज्ञांकडे नाही.

Ozone Layer
Chroming Trend: सोशल मीडियावरील ट्रेंडमुळे 13 वर्षीय मुलीचा मृत्यू; क्रोमिंग ट्रेंड नेमका काय आहे?

ओझोन हा एक नैसर्गिक वायू आहे जो स्ट्रॅटोस्फियरच्या थरात आढळतो. हे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करते. १९८५ मध्ये अंटार्क्टिकावरील ओझोन थराचा छिद्र पहिल्यांदाच सापडला. हा शोध ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. ओझोन थरातील वाढत्या छिद्रामुळे १९८० च्या दशकाच्या मध्यात क्लोरोफ्लुरोकार्बन वायूच्या (CFC) उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती.

१९८५ पासून, ओझोन छिद्राचा आकार कमी करण्यासाठी जगभरात अनेक पावले उचलली गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.