प्रवाशांनो, सावधान! Air India च्या विमानात आढळलाय साप; DGCA चे तात्काळ चौकशीचे आदेश

विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप कसा पोहोचला याचा तपास सुरू आहे.
Snake Found on Air India Express
Snake Found on Air India Expressesakal
Updated on
Summary

विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप कसा पोहोचला याचा तपास सुरू आहे.

'एअर इंडिया एक्सप्रेस'च्या (Air India Express) विमानात साप आढळल्यानं खळबळ उडालीय. विमान दुबई विमानतळावर (Dubai Airport) उतरल्यानंतर कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. विमान वाहतूक नियामक DGCA या घटनेची चौकशी करत आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसचं B737-800 विमान कालिकत, केरळ येथून आलं होतं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (Directorate General of Civil Aviation) वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, दुबई विमानतळावर पोहोचल्यावर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये एक साप (Snake) आढळून आला. त्यानंतर विमानतळाच्या अग्निशमन सेवांना याबाबत माहिती देण्यात आली. हे ग्राउंड हँडलिंग फॉल्टचं प्रकरण आहे. या घटनेची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन अधिकाऱ्यानं दिलंय.

Snake Found on Air India Express
BJP MP : काँग्रेसनं लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणलं असतं, तर मला 4 मुलं झाली नसती; भाजप खासदाराचा हल्लाबोल

विमानात साप कसा पोहोचला?

विमानाच्या कार्गो होल्डमध्ये (Cargo Hold) साप कसा पोहोचला याचा तपास सुरू आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, साप आढळल्यानंतर प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं आणि पुढील उड्डाण करण्यापूर्वी विमानाची पूर्णपणे साफसफाई करण्यात आली. डीजीसीएनं या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()