''हिंदुंना जगाशी प्रॉब्लेम नसतो, मात्र दरवेळी मुस्लिमच...'' हमास सहसंस्थापकाच्या मुलाचं स्फोटक विधान

Hamas leader's son says Muslims should not fight Hindus
मोसाब हसन युसूफ
मोसाब हसन युसूफEsakal
Updated on

Hamas Israel War : हमासच्या सहसंस्थापकाचा मोठा मुलगा मोसाब हसन युसूफ याने एक स्फोटक विधान केल्याने जगाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आहे. तो म्हणाला की, जगामध्ये मुस्लिमांकडूनच हिंसाचार का होत आहे? भारतीयांना आणि हिंदुंना जगाशी काही अडचण नाहीये. ईसाई, यहुदी हेसुद्धा सोबत असतात.

इस्राइलने हमासच्या विरोधात युद्ध पुकारलेलं असताना आणि गाझापट्टीमध्ये भीषण विध्वंस सुरु असताना मोसाब हसन युसूफच्या या विधानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. यापूर्वीदेखील मोसाबने म्हटलं होतं की, इस्राइलवर हमासने केलेला हल्ला किंवा हमासच्या क्रूरतेमुळे मी जराही आश्चर्यचकीत झालेलो नाही.

मोसाब हसन युसूफने भारतीय न्यूज चॅनेल 'टाईम्स नाऊ'शी संवाद साधला. त्याने भारतीयांना हमासच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आणि हमासला अतिरेकी संघटना म्हटलं आहे.

''नागरिकांवर हल्ला करण्याचा हमासचा मोठा इतिहास आहे. ते लोक गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, किराणा दुकान, क्लब, शाळा, यांवर हल्ले करतात. इस्राइलवर ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचं जगाला आश्चर्य का वाटलं? हे मला कळलं नाही.''

युसूफ पुढे म्हणाला की, इस्राइलचा नाश करणं हेच हमासचं ध्येय आहे. हमासच्या स्थापनेपासून त्यांचं तेच उद्दीष्ट आहे. भारताला जगाची प्रॉब्लेम नाही, हिंदुंना नाही, ज्यूंना नाही.. दरवेळी मुस्लिमच हिंसा का करतात? असा थेट सवाल त्याने उपस्थित केला.

युसूफ हा हमासचा सहसंस्थापक शेख हसन युसूफ याचा मुलगा आहे. त्याचा जन्म रामल्ला येथे झाला. त्याच्या विधानांनी आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.