महादेव बेटिंग अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर दुबईत लागला गळाला; भारतात होणार प्रत्यार्पण?

महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला दुबईमध्ये घर कैदेत ठेवण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
Sourabh Chandrakar
Sourabh Chandrakar
Updated on

नवी दिल्ली- महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला दुबईमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. भारती सुरक्षा यंत्रणा, तसेच सक्तवसुली संचालनालयाकडून याबाबत दुबई सरकारला सतर्क करण्यात आले होते. तसेच त्याला भारतात आणण्यासाठी या यंत्रणा प्रयत्न करत आहेत. (Sourabh Chandrakar one of the promoters of the Mahadev online betting app has been put under house detention in Dubai)

महादेव अॅप घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार त्याला एका घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय यंत्रणा त्याच्या शोधात आहेत.

Sourabh Chandrakar
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना करावी लागली महादेव जानकर यांची मनधरणी, मात्र झालं तरी काय होतं ?

ईडीच्या विनंतीवरुन इंटरपोलने मागच्या आठवड्यात रवी उप्पल याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले होते. उप्पल हा देखील याप्रकरणी एक मुख्य आरोपी आहे. महादेव ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणाची पाळेमुळे अनेक राज्यात आढळून आले आहेत. विशेष करुन छत्तीसगडमध्ये याचे मोठे रॅकेट होते असं सांगितलं जातं. दोन्ही आरोपींना भारतात आणण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

Sourabh Chandrakar
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना करावी लागली महादेव जानकर यांची मनधरणी, मात्र झालं तरी काय होतं ?

नोव्हेंबरमध्ये असिम दास आणि भीम यादव यांना छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. ईडी याप्रकरणी एक नवे चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे. सौरभ चंद्राकर हा छत्तीसगडमध्ये एका ज्युसच्या दुकानावर काम करायचा. त्यानंतर तो दुबईत गेलो होता. दुबईमध्ये त्याच्या लग्नात २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. तसेच यावेळी त्याने अनेक सेलेब्रिटिंना निमंत्रित केलं होतं. त्यामुळे तो यंत्रणांच्या नजरेत आला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.