South Africa elections: सत्ताधारी पक्षाला गादी सोडावी लागणार, देशभरातील मतमोजणीतून कल स्पष्ट

South Africa elections: साऊथ आफ्रिकेमध्ये देखील यावर्षी निवडणुका पार पडल्या आहेत. साऊथ आफ्रिकेमधील निकाल धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल.
elections
elections
Updated on

नवी दिल्ली- भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये २०२४ या वर्षी निवडणुका होत आहेत किंवा झाल्या आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये देखील यावर्षी निवडणुका पार पडल्या आहेत. साऊथ आफ्रिकेमधील निकाल धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल. कारण, तब्बल तीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC) पक्षाला पहिल्यांदा बहुमत गमवावे लागणार आहे.

मतांची मोजणी सुरु झाली असून पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाला फक्त ४३ टक्के मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीवेळी म्हणजे २०१९ मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला ५७ टक्के मतं मिळाली होती. याचा अर्थ यावेळी पक्षाला मोठा फटका बसला आहे. लिबरल डेमोक्रेटिक पक्षाला २५ टक्के मतं मिळाली आहेत. तर, लेफटिस्ट इकॉनॉमी फ्रिडम फायटर्स पक्ष तिसऱ्या स्थानी आहे. त्याला ९ टक्के मतं मिळाली आहे.

elections
Exit Poll Date And Time: लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल कधी? जाणून घ्या वार, तारीख अन् वेळ

साऊथ आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकल झुमा यांच्या पक्षाला आठ टक्क्यांच्या जवळपास मतं मिळाली आहेत. अंतिम निकाल दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण, गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या एएनसी पक्षाची ही मोठी पिछेहाट म्हणावी लागेल. देशातील तरुणांनी १९९४ पासून एकाच पक्षाची सत्ता पाहिली आहे.

सत्ताधारी पक्ष बहुमत गमावण्याची शक्यता असल्यामुळे येत्या काळात देशात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय देशामध्ये नव्या राजकीय शक्यता किंवा आघाड्या पाहायला मिळू शकतात. विद्यमान अध्यक्ष रामाफोसा यांचा पक्ष ५० टक्क्यांपेक्षा कमी मतं मिळवत असल्याने इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असं बोललं जात आहे.

elections
Mukesh Ambani: भारत जिंकले आता जिओची आफ्रिकन सफारी! अंबानींचा 'या' देशातील दूरसंचार उद्योगावर डोळा, काय आहे प्लॅन?

आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्ष हा देशामध्ये सुरुवातीपासूनच प्रभावशाली राहिला आहे. श्वेतवर्णीयांच्या बहुसंख्याकवादाला बाजूला सारुन आणि नव्या सामाजिक उत्थानाच्या योजना आणून एएनसीने राजकारणाला सुरुवात केली होती. लाखो लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं श्रेय पक्षाला दिलं जातं. पण, याच काळात पक्षाकडून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगण्यात येतंय. तसेच अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()