HIV च्या भीतीने स्पुटनिकला दक्षिण आफ्रिकेने नाकारली परवानगी

sputnik-covishield
sputnik-covishieldsakal media
Updated on
Summary

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने रशियाची कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक व्ही ला मंजुरी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने रशियाची कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक व्ही ला मंजुरी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुरुषांमध्ये एचआयव्हीचा धोका वाढू शकतो असं म्हणत स्पुटनिकच्या मंजुरीला नकार देण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत करण्यात आलेल्या अभ्यासानंतर हा निर्णय़ घेण्यात आला आहे. अभ्यासातून अशी माहिती समोर आली की एडेनोव्हायरसच्या संशोधित रुपाच्या सुरक्षेची चाचणी घेण्यात आली होती. हा एक व्हायरसचा प्रकार आहे. यामुळे श्वसनाचे संसर्ग होऊ शकतात. याला Ad5 नावाने ओळखलं जातं.

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने म्हटलं की, दक्षिण आफ्रिकेत स्पुटनिकच्या वापराने एचआयव्ही संसर्ग आणि लस घेतलेल्या पुरुषांमध्ये एचआयव्हीचा धोका वाढू शकतो. स्पुटनिक व्ही एचआयव्ही प्रसार रोखण्यात आणि सुरक्षा देण्यात यशस्वी ठरेल असा कंपनीकडे कोणताही पुरावा मिळाला नाही किंवा त्यासंदर्भात डेटा देण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

स्पुटनिक व्ही तयार करणाऱ्या रशियाच्या गमलेया सेंटरने दक्षिण आफ्रिकेने केलेला दावा तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने म्हटलं की, याबाबतचा डेटा उपलब्ध करून देण्यात येईल.

sputnik-covishield
कोव्हॅक्सिनला मंजुरी कधी? WHO ने दिली माहिती

दक्षिण आफ्रिकेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्याशिवाय आफ्रिकेसमोर एचआयव्हीचे संकटसुद्धा आहे. जगातील सर्वाधिक एचआयव्ही बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आहेत. २०२२ पर्यंत ४० मिलियनपैकी फक्त एक चतुर्थांश नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालं आहे.

रशियाने दावा केला की, डेल्टा कोरोना व्हेरिअंटविरोधात त्यांची स्पुटनिक व्ही ९० टक्के प्रभावी ठरली होती. डेल्टा व्हेरिअंट वेगाने पसरत असताना रशियाने कोरोना व्हॅक्सिन मार्केटमध्ये उतरवली असती. तेव्हा कंपनीने असा दावा केला होता की, लस कोरोनाच्या मूळ स्ट्रेनवर ९२ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.