जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा (South African President Cyril Ramaphosa) यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची त्यांच्या कार्यालयाने रविवारी (ता.१२) कळविले. राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांना कोरोना अशा वेळी झाला की देशात एकाच दिवशी ३७ हजार ८७५ नवीन सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली गेली. शनिवारी (ता.११) नाट्यमयरित्या १७ हजार १५४ नवीन रुग्णसंख्या नोंदली गेली. राष्ट्राध्यक्षांची केप टाऊनमधील माजी उपराष्ट्रपती एफ डे क्लर्क यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलेले स्टेट मेमोरियल सर्व्हिसमधून निघताना तब्येत बिघडू लागली. राष्ट्राध्यक्षांचे आरोग्य चांगले आहे. त्यांच्यावर दक्षिण आफ्रिकन लष्करी आरोग्य सेवेच्या दक्षिण (South African President Cyril Ramaphosa Tested Covid-19 Positive) आफ्रिकन राष्ट्रीय संरक्षण दलाच्या वतीने लक्ष ठेवले जात आहे, असे मोंडली गुंगुबेले यांनी प्रसिद्धपत्रकात सांगितले. (South Africa)
गुंगुबेले म्हणाले, की राष्ट्राध्यक्षांनी कोरोना लक्ष घेतली आहे. सध्या ते केप टाऊनमध्ये स्व-विलनीकरणात आहे. उपराष्ट्रपती डेव्हिड माबुझा हे आठवडाभर राष्ट्रपतीच्या वतीने सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील, असे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळाने चार पश्चिम आफ्रिकन देशांना भेटी दिल्या. या दरम्यान ते कोरोनाबाधित झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.