ऐकावं ते नवलंच! महिलेने दिला 10 मुलांना एकत्र जन्म!

ऐकावं ते नवलंच! महिलेने दिला 10 मुलांना एकत्र जन्म!
Updated on

केपटाऊन : तुम्ही आसपास जुळे मुले झाल्याचे खूप वेळा ऐकले असेल. कित्येकदा एखाद्या महिलेना (तिळ्ळ) 3 मुलांना जन्म दिल्याचेही ऐकले असले पण तुम्ही एखाद्या महिलेने 10 मुलांना एकत्र जन्म दिल्याचे ऐकले आहे का? साउथ अफ्रीका (South Africa) मध्ये अशीच एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. इतकेच नव्हे या घटनेने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. गोसियामी धमारा सिटहोल (Gosiame Thamara Sithole) नवाच्या एका महिलेने 10 मुलांना एकत्र जन्म दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 37 वर्षांच्या गोसियामी धमारा सिटहोल यांना 7 मुले आणि 3 मुलींना एकत्र जन्म दिला आहे. त्यांच्या प्रेग्‍नेंसीदरम्यान डॉक्‍टरांनी त्यां 6 मुलांना जन्म देतील असे सांगितले होते. पण जेव्हा 7 जूनसा गोसियामी यांचे ऑपरेशन केले त्यानंतर त्यांनी 10 मुलांना जन्म दिला. गोसियामी सांगितले की, त्यांच्या नवऱ्यांला असे वाटत होते की त्यांना 8 मुले होतील. आपल्या सर्व मुलांना स्वस्थ असल्याचे पाहून कुटुंबातील सगळे सदस्य आनंदी आहेत.''

गोसियामी यांनी सांगितले की, प्रेग्‍नेंसीच्या काळात जेव्हा डॉक्‍टरांना वाटले की त्यांच्या पोटात 6 मुल आहे तेव्हा त्यांनी खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला. डॉक्‍टरांना माहीत होते की थोडासा निष्काळजीपणा देखील मुलांच्या जीवावर बेतला असता. गोसियामी एकदा खूप आजारी पडल्या होता. त्यांनी सांगितले की, प्रेग्‍नेंसीच्या काळाता त्यांना खूप त्रास झाला पण त्यांच्या डोक्यात एकच विचार सुरु होता की त्यांची मुल स्वस्थ राहायला हवी.

ऐकावं ते नवलंच! महिलेने दिला 10 मुलांना एकत्र जन्म!
विदेशी नागरिकांमध्ये संस्कृत शब्दाची क्रेझ

मीडिया रिपोर्ट नुसार गोसियामी यांची सर्व मुले पुर्णपण स्वस्थ आहेत, पण सध्या काही काळ त्यांना इनक्यूबेटर्समध्ये ठेवल आहे.ऑनलाइन रिपोर्टनुसार, गोसियामी यांची गर्भधारणा नैसर्गिक पध्दतीने झाली होती. प्रेग्‍नेंसीच्या काळात त्याना कित्येक वेळा अडचणींचा सामना करावा लागासा. त्याच्या पाय आणि कंबर नेहमी दुखत असे. त्यांना माहित होते की त्यांची एक चूक मुलांच्या जीवावर बेतू शकते. आज सगळ व्यवस्थित झाले असून गोसियामी जगातील एकाच प्रेग्नसीमध्ये सर्वात जास्त मुलांना जन्म देणारी स्त्री ठरली आहे. या आधी हा रेकॉर्ड मोरक्को मध्ये माली येथील हलीमा सीसी यांच्या नावे होता. हलीमा यांनी 9 मुलांना एकत्र जन्म दिला होता. त्यामध्ये 5 मुली आणि 4 मुलांचा समावेश होता. गोसियामी यांनी एका महिन्याच्या काळावधीमध्येच हलीमा सीसी यांचा हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.