South Korea threats kim jong:अमेरिकेची पाणबुडी दक्षिण चीनी सागरात, दक्षिण कोरियाची किम जोंग उनला खुली धमकी

Us Submarine in South China Sea:अमेरिकेची पाणबुडी जवळ येताच दक्षिण कोरियाची किम जोंग उनला धमकी, १२०० किमीच्या पल्ल्यात कुठेही करु शकते हल्ला
kim jong un guam
kim jong un guamesakal
Updated on

South Korea Warns Kim Jong Un:दक्षिण कोरियाने आपले शेजारी राष्ट्र उत्तर कोरियाला मोठी धमकी दिली आहे. दक्षिण कोरियाने म्हटलंय की तो एक आण्विक हल्ला करेल आणि किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील पूर्ण शासनाचा अंत होईल. माध्यम संस्थानी शुक्रवारी (दि.२२ जुलै) ही माहिती दिली. दक्षिण कोरियाकडून ही धमकी तेव्हा आली, जेव्हा अमेरिकेची आण्विक पाणबुडी त्यांच्याजवळ तैनात झाली.

किम जोंग उन आधी धमकी देत म्हणाले होते की या ठिकाणी अमेरिकेच्या आण्विक पाणबुड्या आणि दुसऱ्या हत्यारांच्या तैनातीचा अर्थ असा आहे की त्यांचा देशही अण्वस्त्रांचा हल्ला करु शकतो.

kim jong un guam
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?

माध्यमांच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाचे रक्षामंत्री कांग-सुन-नाम मागील काही दिवसांत १८,७५० टन वजनाची आण्विक पाणबुडी आल्याने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी मागच्या आठवड्यात दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात झालेल्या आण्विक सल्लागारांच्या झालेल्या बैठकीवर आक्षेप घेतला होता. (Latest Marathi News)

किम जोंग उन प्रशासनाची प्रतिक्रिया

अमेरिकेने आपला मित्र देश दक्षिण कोरियाला १८,७५० टन वजनाची ओहिओ क्लास आण्विक बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी यूएसएस केंटुकी पाठवली आहे. यामुळे किम जोंग उन प्रशासन भडकलंय. उत्तर कोरियाकडून वारंवार धमकी दिली जात आहे. उत्तर कोरियाने धमकी दिल्यावर दक्षिण कोरियाच्या रक्षा मंत्रालयाने देखील चेतावणी जारी केली आहे.

kim jong un guam
Sakal Podcast : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ते भाजप आमदार कोर्टावरच चिडले

दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय की, "दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या मैत्रीविरुद्ध जर उत्तर कोरियाने अण्वस्त्र हल्ला केला तर आम्ही त्वरित आणि जोरदार हल्ला करुन निर्णायक प्रतिक्रिया देऊ. आम्ही पुन्हा एकदा इशारा देतोय, एक हल्ला करु आणि पूर्ण उत्तर कोरियाच्या प्रशासनाचा अंत होऊन जाईल."

यूएसएस केंटुकी पानबूडी का आहे इतकी खास ?

यूएसएस केंटुकी पाणबुडी मंगळवारी बूसान शहरात पोहोचली होती. ओहियो क्लासची यूएसएस केंटुकीवर उत्तर कोरियाच्या शस्त्रागारापेक्षा जास्त अणू हत्यारं आहेत. ही पाणबुडी अण्विक शक्तीवर चालते. या पाणबुडीवर २० ट्रायडंट डी-५ बॅलिस्टिक मिसाईल तैनात आहे. या आण्विक मिसाईलची रेंज १२०० किमीपर्यंत आहे. या पानबूडीची लांबी ५६० फीट आणि डिस्प्लेसमेंट १८,७५० टन आहे.

kim jong un guam
Khalapur Irshalwadi rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर ; बचावकार्याला पून्हा सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.