स्पेस एक्सची अंतराळ सफर यशस्वी; फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग

SpaceX Landing : फाल्कन ९ रॉकेटने १५ सप्टेंबर रोजी अवकाशात झेप घेतली होती.
SpaceX
SpaceXTeam eSakal
Updated on

एलन मस्क (Elon musk) यांच्या स्पसेएक्स (Spacex) कंपनीने महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटने १५ सप्टेंबर रोजी फ्लोरिडाच्या केनडी स्पेस सेंटरमधुन (Kennedy Space Center) चार पर्यटकांना घेऊन अवकाशाच्या दिशेने यशस्वी झेप घेतली होती. त्या सर्वजणांनी फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर सुरक्षित लँडिंग केलं आहे. भारतीय वेळेनुसार सुमारे ४:३० वाजता या पॅरॅशूटच्या सहाय्याने अटलांटिक समूद्रात लॅंडिग केलं आहे.

अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत पोचविणे, तेथून पृथ्वीवर यानाद्वारे सुखरूप आणण्यात यशस्वी ठरलेली एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनीने नवा इतिहास रचला आहे. कंपनीतर्फे अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात आले असून, ते यशस्वीरित्या परतले आहेत. ‘इन्स्पिरेशन -४’ या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. यातून चार जणांना अंतराळाची सैर करण्याची संधी मिळाली असून, फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यान चौघांना घेऊन अवकाशात भरारी घेतली होती. ते सर्व जण आपली अवकाश यात्रा पूर्ण करून परतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.