किळसवाणं क्रौर्य! आईचे हजार तुकडे करून श्वानसह स्वत: खाल्ले

मुलानं गाठला विकृतीचा कळस; आईचे तुकडे करुन कुत्र्यासोबत खाल्ले
किळसवाणं क्रौर्य! आईचे हजार तुकडे करून श्वानसह स्वत: खाल्ले
Updated on

किळस, घृणा आणि बिभीत्स वाटावी अशी एक अमानवीय घटना नुकतीच समोर आली आहे. एका मुलाने (son) चक्क आपल्या आईची हत्या करुन तिच्या शरीराचे हजार तुकडे केले. इतकंच नाही. तर, या मुलाने चक्क आपल्या आईच्या मृतदेहाचं मांस स्वत: खाल्लं आणि आपल्या श्वानालादेखील (dog) दिलं . २०१९ मध्ये घडलेल्या या घटनेचा नुकताच निकाल लागला असून या युवकाला दोषी ठरवण्यात आलं आहे. (spain cannibal son cut mum into 1000 tiny pieces ate her raw and fed her to dog)

स्पेनमध्ये (spain) राहणाऱ्या साचेज गोमेज याने फेब्रुवारी २०१९ मध्ये आपल्या आईची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे १ हजार लहान लहान तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवलं. इतकंच नाही तर या पुढे त्याने किळसपणाचा कहर केला. त्याने जवळपास २ आठवडे आपल्या आईचं मांस खाल्लं. सोबतच त्याच्या पाळीव श्वानालादेखील दिलं.

किळसवाणं क्रौर्य! आईचे हजार तुकडे करून श्वानसह स्वत: खाल्ले
VIDEO: कोरोनावर मात केल्यानंतर टुथब्रश का बदलावा?

संबंधित महिलेच्या हत्येची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी गोमेज यांच्या घराची तपासणी केली. यावेळी गोमेज यांच्या घरातील फ्रीजमध्ये साचेजच्या आईच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. तसंच घरातील ड्रॉव्हरमध्ये त्यांची हाडे व डोकं, हात आणि हृदय एका बेडरुममध्ये सापडले. साचेजने त्याच्या आईचा गळा दाबून खून केला आणि त्या मृत झाल्याचं समजल्यानंतर त्याने पुढील किळसवाणं कृत्य केलं.

साचेजने केलेलं अमानवीय कृत्य समोर आल्यानंतर त्याच्या वकिलांनी गोमेज हा मनोरुग्ण असल्याचा दावा केला होता. मात्र, स्पेनच्या न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला दोषी ठरवलं आहे. नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून त्याला १५ वर्ष ५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली आहे.

दरम्यान, घरात टीव्ही पाहत असताना आईला ठार मार असा गुप्त संदेश त्याचा मिळाल्याचा दावा साचेजने केला. मात्र, त्याचा हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सोबतच सरकारी पक्षाने गोमेजला १५ वर्ष व ५ महिन्यांची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()