Spanish Travel Vlogger's Assault Case: 'पतीला बांधलं अन्...माझ्यावर अत्याचार...', स्पॅनिश महिलेने सांगितली तिच्यासोबत घडलेली भयानक घटना

Spanish Travel Vlogger's sexual assault: झारखंडमधील बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, घटनेदरम्यान सातही आरोपी तिला सतत लाथा मारत राहिले.
Spanish Travel Vlogger's Assault Case
Spanish Travel Vlogger's Assault CaseEsakal
Updated on

Spanish Travel Vlogger's Assault Case: झारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री एका स्पॅनिश महिला पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. अद्याप चार जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनेची माहिती पोलिसांना सांगितली आहे..

पीडित महिलेने सांगितली आपबिती

स्पॅनिश पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, घटनेदरम्यान सात आरोपी तिला सतत लाथा मारत होते. एवढेच नाही तर पीडित विदेशी महिलेने सांगितले की, तिच्या पतीचेही त्यावेळी हात बांधण्यात आले होते. तिच्या पतीला देखील मारहाण करत होते.

पीडित महिलेने सांगितले की, 'मला वाटले की, आरोपी मला त्या रात्री मारतील पण देवाच्या कृपेने मी अजून जिवंत आहे.'

Spanish Travel Vlogger's Assault Case
Video: प्रेम आंधळं नाही तर 'बर्गर' असतं; महिलेने 20 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी केलं लग्न; वाचा 'प्यार वाली' लव्ह स्टोरी!

दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन परिसरात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला.

28 वर्षीय स्पॅनिश महिला आणि तिचा 64 वर्षीय पती बांगलादेशातून बाइक टूरवर निघाले होते आणि झारखंडमार्गे नेपाळला जात होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर स्पॅनिश महिलेला सरैयाहाट सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ ही घटना घडली.

Spanish Travel Vlogger's Assault Case
Pakistan New Prime Minister: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा शेहबाज शरीफ, 'इतक्या' मतांनी जिंकली निवडणूक

तिघांना अटक, चार आरोपींचा शोध सुरू : एस.पी

या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषदेत एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी सांगितले की, महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात जणांपैकी तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली असून उर्वरित चौघांना लवकरच पकडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, इतर चार आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे, त्यांना लवकरच पकडण्यात येईल. पोलीस नवी दिल्लीतील स्पेनच्या दूतावासाच्या संपर्कात आहेत.

Spanish Travel Vlogger's Assault Case
India's most Wanted Terrorists in Pakistan: भारतात मोस्ट वॉन्टेड असणारा आणखी एका दहशतवादी संपला, पाकिस्तानात झाली हत्या... काश्मीरमधील हल्ल्यांमागे होता हात

झारखंडमध्ये परदेशी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत भाजपनेही राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे.

या घटनेबद्दल भाजप आमदार अनंत ओझा म्हणाले, 'हे राज्यासाठी लांच्छनास्पद आहे आणि राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था दर्शवते. इथे परदेशी लोकही सुरक्षित नाहीत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि सरकारनेही याची दखल घ्यावी. अशा अराजकतावाद्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.